Akshardhara Book Gallery
Shivrajyabhishek : Prayojan, Prakriya Aani Parinam (शिवराज्याभिषेक: प्रयोजन, प्रक्रिया आणि परिणाम)
Shivrajyabhishek : Prayojan, Prakriya Aani Parinam (शिवराज्याभिषेक: प्रयोजन, प्रक्रिया आणि परिणाम)
Couldn't load pickup availability
Author: Dr. Sadanand More
Share
Publisher: Sakal Prakashan
Pages: 109
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Shivrajyabhishek : Prayojan, Prakriya Aani Parinam (शिवराज्याभिषेक: प्रयोजन, प्रक्रिया आणि परिणाम)
माणूस जन्माला येताना तीन ऋणे बरोबर घेऊन येतो असे भारतीय परंपरा सांगते. ही परंपरागत समजूत सर्वच मानवांना लागू होते असे म्हणायला काहीच हरकत नाही. इतकी ती सर्वव्यापक आहे. साहजिकच ती महाराष्ट्रातील लोकांनाही लागू होते. पण देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण यांच्याशिवाय महाराष्ट्रातील माणसे आणखी एक ऋण बरोबर घेऊन जन्माला येतात. ते ऋण म्हणजे अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचे ऋण! छत्रपतींच्या या ऋणाची विस्ताराने चर्चा करता येईल. तथापि अगदी एकच महत्त्वाचा मुद्दा सांगायचा झाल्यास असे म्हणता येईल की महाराजांनी महाराष्ट्राला अस्मिता दिली.
'अस्मिता' या शब्दाच्या जवळ येणारा इंग्रजी शब्द 'identity' आणि दुसरा मराठी शब्द म्हणजे 'ओळख'. मात्र 'अस्मिता' म्हणजे फक्त ओळख नव्हे; तर जिचा अभिमान वाटावा, जी घेऊन मिरवावेसे वाटते अशी ओळख.
लेखक:डॉ. सदानंद मोरे
