Skip to product information
1 of 2

Dusare Prometheus : Mahatma Gandhi (दुसरे प्रॉमिथिअस : महात्मा गांधी)

Dusare Prometheus : Mahatma Gandhi (दुसरे प्रॉमिथिअस : महात्मा गांधी)

Regular price Rs.108.00
Regular price Rs.120.00 Sale price Rs.108.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 96

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

ग्रीक दंतकथेतील प्रॉमिथिअस म्हणजे मानव कल्याणार्थ व्यथा, वेदना सहन करून साहसाने मनुष्य संस्कृतीचा विकास करणारा दिव्यपुरुष होय. वि. स. खांडेकरांना महात्मा गांधींचं जीवन व व्यक्तिमत्व हे प्रॉमिथिअससारखं वाटत आलंय. ते गांधीजींना विसाव्या शतकातील प्रॉमिथिअस मानत. त्या अर्थाने गांधीजी दुसरे प्रॉमिथिअस होत. खांडेकरांनी गांधी जन्मशताब्दीच्या निमित्ताने लिहिलेल्या या संग्रहातील लेखनातून गांधीजी प्रॉमिथिअसची तळमळ घेऊन आपणापुढे येतात. सारा देश मूल्यर्‍हासाने होरपळत असताना सदाचाराची सदाफुली रुजवणारे गांधींचे व्यक्तिमत्व या लेखातून वाचकांच्या मनात आशेची नवी उर्मी निर्माण करतात. गांधीजींचे जीवन व विचार नव्या अंगाने समजावून सांगणारा खांडेकरांचा हा लेखसंग्रह कर्मकांडाच्या जागी कर्मयोग रूजवू इच्छिणार्‍या वाचकाच्या मनात सामाजिक धर्मबुध्दी जागवणारं आगळं महात्मायन होय. धर्म, जात, देश इत्यादी संदर्भातील संकीर्ण जाणिवा जोपासू पहाणार्‍या मूलतत्ववादी विचारांचा पराभव घडवून आणायचा तर हा ‘दुसरा प्रॉमिथिअस’ समजून घ्यायलाच हवा.

ISBN No. :9788177664577
Author :V S Khandekar
Publisher :Mehta Publishing House
Binding :Paperback
Pages :96
Language :Marathi
Edition :Latest
View full details