Skip to product information
1 of 2

akshardhara

Karavari Mati (कारवारी माती)

Karavari Mati (कारवारी माती)

Regular price Rs.540.00
Regular price Rs.600.00 Sale price Rs.540.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

ही कादंबरी सुरु होते १९०१ मध्ये आणि संपते १९४७ साली. उत्तर कन्नडामधील, अंकोला तालुक्यातील, होन्नेकेरी या खेड्यातील एका वाड्यात राहणारा, गणपतराय हिचकड आणि त्याचा मुलगा विद्याधर हे दोघे केंद्रवर्ती असणार्याा ह्या कादंबरीत, त्या दोघांच्या अवास्तव बौद्धिक तसेच भावनिक अहंकारामुळे, त्या कुटुंबातील व्यक्तींची आणि त्यांच्या नातेवाइकांची होत गेलेली फरफट, त्या सार्यां च्या स्वभावांचे विलक्षण कंगोरे, त्यातूनच त्यांचं घडणं, मोडणं आणि पुन्हा नव्याने घडणं या सगळ्यांचा कादंबरीकाराने सूक्ष्म निरीक्षण पध्दतीने जो वेध घेतला आहे; तो मनोवेधक आणि विलक्षण आहे. याखेरीज स्वातंत्र्य लढ्यामुळे प्रकाशात आलेल्या टिळक, गांधी, सावरकर, सुभाषचंद्र बोस, नेहरु, ह्या नेत्यांविषयी, कम्युनिष्ट पार्टी, कॉंग्रेस, मार्क्सवाद, मानवतावाद, धर्म आणि धर्माचरण तसेच हिंसा-अहिंसा या कल्पना सामान्य माणसांपर्यंत कशा झिरपत होत्या आणि त्यांच्यावर त्यांचा काय परिणाम होत होता, ते त्यांना कसा प्रतिसाद देत होते याचाही शोध कादंबरीकाराने आपल्या सूक्ष्म निरीक्षणातून, अवलोकनातून, बारीक सारीक नोंदीतून घेतला आहे. त्या नोंदी कधी अचंबित करतात, तर कधी अंर्तमुखसुध्द करतात.
Author :Vasant Narahar Phene
Publisher :Granthali
Binding :Paperback
Pages :620
Language :Marathi
Edition :1st/2017
View full details