Bhetigathi (भेटीगाठी )

Shankar Patil
-
9788184981216
Mehta Publishing House
विनोदी

Rs.99/-

M.R.P.: Rs.110

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

तो असा बसताच चाबूक कडाडे... वादी पिंजून जाई, तुटून जाई. निबार कातडीवर वळ उठत. दवबिंदूगत रक्ताचे थेंब अंगावर थरथरत उभे राहत. कोयंड्याची काठी चिंबून, एकेक कुंडं मनगटाएवढा उठे; पण सर्जा जागचा हलत नसे. हे बघून लोक त्याला ‘बशा’ म्हणायचे. बशा बैल म्हणून सर्जाचं नाव बद्‍दू झालं. म्हातारपणी त्याच्या नशिबी बोल आला. त्याच्या गुणाला बट्टा लागला... मृगाचा पाऊस सुरू झाला आणि सर्जाचं हाल कुत्रं खाईनासं झालं. म्हशीपुढची काढलेली चिपाडं, शेणामुतात भिजलेला गदाळा त्याच्या वाट्याला येऊ लागला. पोट जाळायला तो तेसुध्दा खायचा-हपापून अप्रुपाईनं खायचा. पण त्याच्या पोटाची खळगी भरली नाहीत. आतडी रिकामी राहिली. त्यात कामानं त्याची झडती घेतली आणि आता बसलं तर उठता येईना आणि उठलं तर बसता येईना अशी त्याची दशा झाली.

  • AuthorShankar Patil
  • Translator-
  • Edition2012/09 - 2nd
  • Pages120
  • Weight (in Kg)0.13
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Bhetigathi (भेटीगाठी )

Bhetigathi (भेटीगाठी )

Related Products