Bhoomika (भूमिका)

Yashwantarao Chavan
-
9789382591023
Rohan Prakashan
सामाजिक-महाराष्ट्र

Rs.176/-

M.R.P.: Rs.195

You Save: 10% OFF

यशवंतराव चव्हाण - महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणातील लोकप्रिय व कणखर व्यक्तिमत्त्व! कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नसलेल्या खेडयातील एका युवकाचा उपपंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा व प्रेरणादायी आहे. राजकारणातील त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रकारची बरी-वाईट स्थित्यंतरं पाहिली, अनुभवली. त्यांच्या काही राजकीय कॄती वादग्रस्त ठरल्या. तरीही त्यांनी आपली वैचारिक बैठक कधीही सोडली नव्हती. पूर्वग्रहविरहित आणि नि:पक्षपणे विचार करणा-या अभ्यासकाला त्यांच्या वैचारिक दॄष्टिकोणात सुसंगतीच आढळेल. केंद्रीय मंत्री असताना यशवंतरावांनी विविधप्रसंगी केलेली निवडक भाषणं, काही वर्तमानपत्रांसाठी व दिवाळी अंकासाठीच्या मुलाखती व काही लेखांचा या पुस्तकात समावेश केला आहे. १९६५ ते १९७९ या चौदा वर्षांच्या कालखंडातील राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांसंबंधीच्या त्यांची भूमिका काय होती, याचा चिकित्सक वाचकांना या पुस्तकामुळे मागोवा घेता येईल. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात जवळजवळ पंचावन्न वर्षं डोळसपणे वावरलेल्या यशवंतरावांची वैचारिक बैठक व विचारांची सखोलता विशद करणारं हे पुस्तक... ’भूमिका.’

  • Author Yashwantarao Chavan
  • Translator -
  • Edition 1979 - 1st/1979
  • Pages 247
  • Weight (in Kg) 0.268
  • Language Marathi
  • Binding Paperback

No customer reviews for the moment.

Write a review

Bhoomika  (भूमिका)

Bhoomika (भूमिका)

Related Products