Dadachi Girlfriend (दादाची गर्लफ्रेंड)

Ratnakar Matkari
-
0
Majestic Publishing House
नाटक

Rs.90/-

M.R.P.: Rs.100

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

पावणेबारा वर्षांच्या एका मुलाला, आणि तेरा पूर्ण वयाच्या त्याच्या मैत्रिणीला, त्या मुलाच्या दादाचे आणि त्याच्या प्रेयसीचे प्रेम कसे निभावून जाईल याचे चिंतामिश्रित कुतूहल आहे, आणि ते निभावून जावे, यासाठी ती दोघे प्रयत्नशील आहेत. आता, टीव्ही, चित्रपट, वृत्तपत्रे आणि आजूबाजूचे वातावरण, यांच्या सौजन्याने, या मुलांना, तरुण-तरुणीचे प्रेम ही गोष्ट काही नवलाईची किंवा आश्र्चर्यकारक राहिलेली नाही. मात्र माध्यमांमधून त्यांना जो दिसतो, तो प्रेमसंबंधातला अगदीच वरवरचा भाग. त्यामुळे, त्याच्या पलीकडचा, म्हणजे मानसिक ते शारीरिक आकर्षणाचा प्रवास, त्यातले टप्पे आणि हेलकावे, त्यातूनही तरुण स्त्रीच्या आणि तरुण पुरुषाच्या प्रेमाकडे पाहण्यातली भिन्नता, हा सारा भाग समोर येताच ही मुले स्वाभाविकपणे गोंधळतात आणि त्याच्या आकलनासाठी वेळप्रसंगी प्रौढांची, डॉक्टरांची आणि पुस्तकांचीही मदत घेतात. थोडक्यात, या बालकांना, लैंगिक शिक्षणाची गरज भासते. या साहसामध्ये त्यांना लैंगिक शिक्षणाबरोबरच आणखी एका गोष्टीची गरज भासते, ती म्हणजे निरागसता- ‘इनसन्स’. अत्यंत निष्कपट वृत्तीने ही मुले, तरुणांच्या प्रीतीचे रहस्य आणि मानवी शरीराचे गूढ उकलू पाहतात. त्याच निर्व्याजतेतून मिळालेल्या सामर्थ्याने, सर्व अडचणींना तोंड देतात. म्हटले तर ही एक परीकथा आहे. तिचा शेवट परीकथेला साजेसा सुखद आहे. परीकथा या तत्कालिक वास्तवाच्या हिशेबाने खोट्या असतात, मात्र एका व्यापक अर्थाने त्या अंतिम वास्तवच सोपे करून, पण ठामपणे सांगत असतात... एका गंभीर वास्तवाची, परीकथेच्या निरागसतेने, तरलतेने आणि अत्यंत रंजकपणे सांगितलेली नाट्यपूर्ण कहाणी- दादाची गर्लफ्रेंड

  • AuthorRatnakar Matkari
  • Translator-
  • Edition2007/07 - 1st
  • Pages79
  • Weight (in Kg)0.118
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Dadachi Girlfriend (दादाची गर्लफ्रेंड)

Dadachi Girlfriend (दादाची गर्लफ्रेंड)

Related Products