Chandnyat (चांदण्यात)

V. S. Khandekar
-
8171616585
Mehta Publishing House
ललित संकिर्ण

Rs.83/-

M.R.P.: Rs.110

You Save: 25% OFF

‘चांदण्यात’ हा श्री. वि. स. खांडेकरांचा दुसरा लघुनिबंध संग्रह. त्यांच्या या पुस्तकाविषयी सुप्रसिध्द समीक्षक प्रा. वा. ल. कुलकर्णी म्हणतात : ‘खांडेकरांच्या लघुनिबंधाचे स्वरूप काहीसे कठीण पृष्ठभागावर उच्छृंखलपणे उड्या मारीत जाणार्‍या रबरी चेंडूसारखे आहे. ‘एखादे लहान मूल एखाद्या सुंदर बगीच्यात सोडावे, या ताटव्यावरून त्या ताटव्याकडे त्याने हर्षभरित अंत:करणाने बागडत बागडत हिंडावे, फुलांचे नयनमनोहर रंग, फुलपाखरांच्या रंगेल भरार्‍या, थुईथुई बागडणारे कारंज्याचे तुषार, गोड लुसलुशीत हिरवळ या सगळ्यांनी त्याला भुरळ पाडावी आणि भटकत भटकत त्याने आपल्या निवासस्थानापासून लांबवर जावे. मग चुकून मागे वळून पाहताच त्याला आपण जेथून निघालो, ते ठिकाण दिसण्याऐवजी जर जिकडे तिकडे फुले, पाने आणि फुलपाखरेच दिसली, तर त्यात काय नवल? ‘कल्पनांच्या कोलांटउड्या खात खात श्री. खांडेकरांची लेखणी इकडून तिकडे बागडू लागली, की तिला भुई थोडी होते. या कोलांट उड्यांत मधूनच सुविचारांचे धक्के वाचकांना बसतात. ममतेचा ओलावा त्यांच्या अंगाला लागतो. ‘लघुनिबंध हा एखाद्या झर्‍यासारखा असावा. एखाद्या खडकातून तो अचानकपणे उगम पावतो. वाट फुटेल, तसा तो धावत जातो. मार्गात एखादी नदी किंवा मोठा ओहोळ भेटला, तर त्यांना तो मिळतो किंवा पाणी आटल्यामुळे अधेमधेच जिरून जातो. असेच का नसावे? ‘कल्पना आणि विचारशक्तीचा उच्छृंखल विलास, असेच मी खांडेकरांच्या लघुनिबंधाचे वर्णन करतो.’

  • AuthorV. S. Khandekar
  • Translator-
  • Edition2006/12 - 4th/1938
  • Pages87
  • Weight (in Kg)0.11
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Chandnyat (चांदण्यात)

Chandnyat (चांदण्यात)

Related Products