Khar Sangayach Tar (खरं सांगायचं तर)

Karan Johar
Nita Kulkarni
9789386493231
Rohan Prakashan
कलाकार चरित्रे

AN UNSUITABLE BOY या पुस्तकाचा मराठी अनुवाद.

More details

Rs.195/-

M.R.P.: Rs.250

You Save: 22% OFF

खरं सांगायचं तर...मी करण जोहरचे चित्रपट फार कधी फॉलो केले नाहीत. दुसरं असं की, या पूर्वी चित्रपटविषयक जी पुस्तकं मी प्रकाशनासाठी निवडली त्याचे विषय होते – ‘लिजेंड’ म्हणता येतील असे कलाकार...गुरुदत्त, एस.डी.बर्मन, साहिर लुधियानवी, वहिदा रहेमान...! अशा पार्श्वभूमीवर करणचं पुस्तक माझ्या निवडीत कसं काय बसलं? करणचे चित्रपट मला आकर्षित करत नव्हते, मात्र ‘कॉफी विथ करण’ त्याच्याविषयीचं कुतूहल मनात निर्माण करत होतं. स्टार अ‍ॅक्टर्स घेऊन ‘कॉफी’चे एपिसोड्स धीटपणे कन्डक्ट करण्याची हातोटी, हजरजबाबीपणा, नर्मविनोदी शैली असे त्याच्यातील गुण त्याच्या तल्लख बुद्धीची चुणूक दाखवत होते. म्हणूनच नंतर ‘AN UNSUITABLE BOY' हे त्याचं आत्मचरित्र उत्सुकतेने वाचलं आणि मला असं जाणवलं की, करण प्रभावीपणे व्यक्त होऊ शकतो. त्याच्याकडे स्वत:चे विचार आहेत, ते स्पष्टपणे मांडण्याएवढा धीटपणा आहे, मोकळेपणा आहे, स्वत:कडे तो पारदर्शीपणे पाहू शकतो, आपल्या खासगी जीवनाविषयीही तो खुलेपणे बोलू शकतो. हातून घडलेल्या चुका तो प्रांजळपणे शेअर करतो. जीवनात नात्यांना अनन्यसाधारण महत्त्व देणा-या करणच्या जीवनविषयक काही स्वत:च्या व्याख्या आहेत...आपल्या दिग्दर्शक ते निर्माता या प्रवासाचा आढावा तो घेतो, पण त्रयस्थपणे. बहुतेक आत्मचरित्रात यशापयशाचेच पाढे वाचलेले असतात. मात्र या आत्मकथनाचा मुख्य सूर ‘खरं सांगायचं तर...’ अशा रोखठोक स्वरूपाचा आहे... आणि म्हणूनच या पुस्तकाचे प्रयोजन! - प्रदीप चंपानेरकर (प्रकाशक)

  • AuthorKaran Johar
  • TranslatorNita Kulkarni
  • Edition1st/2018
  • Pages228
  • Weight (in Kg)0.33
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Khar Sangayach Tar (खरं सांगायचं तर)

Khar Sangayach Tar (खरं सांगायचं तर)

AN UNSUITABLE BOY या पुस्तकाचा मराठी अनुवाद.

Related Products