Rikama Devhara (रिकामा देव्हारा)

V. S. Khandekar
-
8177666428
Mehta Publishing House
कादंबरी संकिर्ण

Rs.117/-

M.R.P.: Rs.130

You Save: 10% OFF

Warning: Last items in stock!

किती मोहक मूर्ती ती! एवढी सुंदर मूर्ती ठेवायची कुठं हा भक्तांना प्रश्र्न पडला. मूर्ती म्हणाली, ‘भक्तांचं हृदय हाच माझा स्वर्ग!’ पण हृदयातली मूर्ती डोळ्यांना कशी दिसणार? सर्व भक्तांनी मूर्तीसाठी एक सुंदर देव्हारा करायचं ठरविलं. कुणी चंदनाचं लाकूड आणलं, कुणी त्यावर सुंदर नक्षीकाम केलं. स्वर्गातलं सर्व सौंदर्य त्या देव्हार्‍यात अवतरलं. देव्हार्‍यातल्या मूर्तीची रोज पूजा होऊ लागली. देव्हार्‍याला शोभतील अशी सुंदर फुलं रोज कोण आणतो, याबद्दल भक्तांत अहमहमिका सुरू झाली. धूप, दीप, नैवेद्य - देव्हार्‍याला शोभतील अशी पूजेची साधनं गोळा करण्यात प्रत्येक भक्त रमून जाऊ लागला. महोत्सवाचा दिवस उगवला. देव्हारा फुलांनी झाकून गेला. धुपानं अदृष्य सुगंधी फुलं फुलविली. दीपज्योती तारकांशी स्पर्धा करू लागल्या. भक्तगण पूजा संपवून समाधानानं मागं वळला. वळता वळता आपला पाय कशाला अडखळत आहे म्हणून प्रत्येकानं वाकून पाहिलं. देव्हार्‍यातली मूर्ती होती ती! ती कुणी कधी बाहेर फेकून दिली होती देव जाणे! पण एकालाही तिची ओळख पटली नाही. प्रत्येक भक्त तिला तुडवून पुढं गेला.

  • AuthorV. S. Khandekar
  • Translator-
  • Edition2011/11 - 1st/1939
  • Pages102
  • Weight (in Kg)0.128
  • LanguageMarathi
  • BindingPaperback

No customer reviews for the moment.

Write a review

Rikama Devhara (रिकामा देव्हारा)

Rikama Devhara (रिकामा देव्हारा)

Related Products