Chitra Vastuvichar (चित्र वस्तुविचार)

Prabhakar Barave
-
0

NOW... ADVANCE BOOKING AVAILABLE

आधुनिक भारतीय चित्रकला प्रवाहातील स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली प्रस्थापित करणारे संवेदनशील मनाचे आणि विलक्षण कल्पनाशक्तीची नैसर्गिक देणगी असलेले चिंतनशील चित्रकार प्रभाकर बरवे यांचे 'चित्र-वस्तुविचार' हे नवीन पुस्तक.

प्रकाशनपूर्व विशेष सवलतीत : रु. ६००/- | प्रकाशनाचा दिनांक : ५ एप्रिल २०१९ - त्यानंतर उपलब्ध ।

Rs.600/-

M.R.P.: Rs.795

You Save: 24.52% OFF

Quantity:

१९७२-७३ नंतरच्या कालखंडात भारतीय चित्रकलेत असलेल्या 'फिगरेटीव्ह' किंवा 'एब्स्ट्रॅक्ट' या दोन प्रवाहांपेक्षा वेगळी अशी काहीशी अतिवास्तवतेकडे झुकणारी, गूढतेचा स्पर्श असलेली, वास्तव आणि अवास्तवाच्या उंबरठ्यावर असलेली आणि भारतीय जीवनाशी, मनाशी संवाद साधणारी शैली बरवे यांनी आधुनिक भारतीय चित्रप्रवाहात प्रस्थापित केली. सर्जनशील चित्रकार असण्याबरोबरच बरवे विचारवंतही होते. आणि आपल्या चित्रविषयक विचारांच्या नोंदीही ते वेळोवेळी करून ठेवत. १९७२ ते १९९५ या तेवीस वर्षांच्या काळात त्यांनी रोजनिश्यांमधून केलेल्या नोंदी हा चित्रकलेच्या अभ्यासकांसाठी मोठाच ठेवा आहे. सभोवतालच्या वस्तूंच्या आकारांपासून स्फूर्ती घेऊन काढलेली असंख्य रेखाटने, सुचलेल्या पेंटिंगविषयीच्या कल्पना, मनात येणाऱ्या चित्रविषयक जाणिवा आणि वेळोवेळची आपली भावस्थिती यांच्या नोंदी या रोजनिश्यांमधून केलेल्या आढळतात. हे सगळे त्यांचे विचार 'चित्र-वस्तुविचार' या ग्रंथात एकत्रित केले आहेत. या पुस्तकात बरवे यांचे दृक्-कला या विषयावरचे चिंतनात्मक लेख आहेत, अनेक मित्रांना, चाहत्यांना लिहिलेली आपल्या चित्रांचे विश्लेषण करणारी पत्रे आहेत आणि बरवे यांच्या काही कविताही आहेत. आकार, अवकाश, रंग, प्रेरणा, कल्पना, मूर्त-अमूर्त, माध्यम संवेदना इत्यादी मूलभूत सर्जनप्रक्रियेतील घटकांवर बरव्यांनी केलेले हे लेखन हा मराठी साहित्याला नवीन असाच प्रकार आहे, असे म्हणता येईल.

AuthorPrabhakar Barave
Translator-
Edition1st/2019
Pages528
Weight (in Kg)1.502 Kg
LanguageMarathi
BindingPaperback
Grade 
28/02/2019

Chitra Vastuvichar (चित्र वस्तुविचार)

आधुनिक भारतीय चित्रकला प्रवाहातील स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली प्रस्थापित करणारे संवेदनशील मनाचे आणि विलक्षण कल्पनाशक्तीची नैसर्गिक देणगी असलेले चिंतनशील चित्रकार प्रभाकर बरवे यांचे 'चित्र-वस्तुविचार' हे नवीन पुस्तक.

  Write a review

  Chitra Vastuvichar (चित्र वस्तुविचार)

  Chitra Vastuvichar (चित्र वस्तुविचार)

  NOW... ADVANCE BOOKING AVAILABLE

  आधुनिक भारतीय चित्रकला प्रवाहातील स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली प्रस्थापित करणारे संवेदनशील मनाचे आणि विलक्षण कल्पनाशक्तीची नैसर्गिक देणगी असलेले चिंतनशील चित्रकार प्रभाकर बरवे यांचे 'चित्र-वस्तुविचार' हे नवीन पुस्तक.

  प्रकाशनपूर्व विशेष सवलतीत : रु. ६००/- | प्रकाशनाचा दिनांक : ५ एप्रिल २०१९ - त्यानंतर उपलब्ध ।

  Write a review

  Related Products