येरवडा गावाविषयी दिलेली माहिती ऐतिहासिकदृष्ट्या वाचकांच्या मनात भर टाकणारी आहे. त्यावेळेच्या वास्तू, त्यांची स्थलदर्शक माहिती, सौंदर्यस्थळे, मुळा-मुठी नदीबद्दल वाटणारे आस्थेवाईक आकर्षण, बंडगार्डनचे फुलं झाडांनी नटलेले रचनात्मक सौंदर्य, म्यूनिसिपालटी दावाखाना, पोलीस चौकी, पर्णकुटी आणखी बरेच काही. एकदंरीत येरवडा गावचे विस्ताररूपी वर्णन करून बालपणीच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.