धर्मपंथ आणि राजनीति, या दोन्ही शक्ति आता नष्ट होउन चुकल्या आहेत. त्यांचे दिवस भरले आहेत.
भागवताबद्दल म्हटले गेले आहे की ते वेदरूपी वृक्षाचे सर्वोत्तम मधूर फळ आहे. भागवताच्या अकराव्या स्कंधात उध्दवाला केलेला उपदेश आहे या स्कंधाच्या 1517 श्लोकांपैकी 306 श्लोक निवडून विनोबांनी भागवत - धर्म - सार तयार केले.
भागवताने ज्याच्या मनाची पकड घेतली नाही, ज्याच चित्ताला रिझविलें, रमविलें आणि शमविलें नाही
हिंदुधर्माचा विकास सखोल चिंतन आणि निष्काम तपश्चर्या या दोन साधनांनी झालेला आहे
आजची धम्मपदाची रचना काहीशी प्रकीर्ण वा सुभाषित - संग्रह यासारखी आहे, आणि त्या रचनेत त्याचें समन्वित दर्शन लपल्यासारखे झाले आहे.
नाथांच्या गाथेतील अनुभव - रत्ने माझे उपयोगासाठी मी अनेक वर्षे सावकाश निवडीत आलो आहे.
गांधीजींच्या सहका-यांमध्ये विनोबांचे स्थान अद्वितीय आहे. विनोबा गांधीजींचे केवळ अध्यात्मिक उत्तराधिकारी नव्हते, आर्थिक - सामाजिक - राजकीय, सर्वच क्षेत्रांत त्यांनी गांधीजींचा वारसा पुढे नेला आणि गांधी कार्याला दिशा दिली.
नाथांच्या गाथेतील अनुभव - रत्ने माझे उपयोगासाठी मी अनेक वर्षे सावकाश निवडीत आलो आहे
गीतेविषयींचें माझें आजतागाइत चिंतन यात थोडक्यात प्रतिबिंबित झालें आहे असे म्हणता येईल.... - विनोबा.
हे नाम - स्मरणाचें पुस्तक आहे. यांत सत्यस्वरूप भगवंताची उपासना आहे. आम्ही सत्यनिष्ठ कसें बनू - असा प्रश्न आरंभी उपस्थित केला आहे.
हदयें जोडण्यासाठी विनोबांनी विभिन्न धर्मांचे सार सर्वांपूढे मांडले. हे ख्रिस्त - धर्म - सार त्याच मालिकेतील एक.
आजकाल मनूवर कैकांचा राग आहे. ते ठीकहि आहे. कारण, मानुस्मृतीत कैक परस्पर - विरोधी विचार आहेत. मी मानीत नाही की ते सर्व मनूचे आहेत.
नामदेवाचे अभंग प्रेमाने भरलेले आहेत. त्याच्या वाणीतला साधेपणा हदयाला वेधल्याशिवाय राहत नाही नामदेव प्रेमळ भक्त आहे.
‘प्रेमपंथ अहिंसेचा’ यात विनोबांची जीवन-कथा त्यांच्याच शब्दांत.
रामदासांनी लिहून तर पुष्कळ ठेवले आहे. परंतु असार सोडून सार घ्यावे हे त्यांच्या सर्व लिखाणाचें सार आहे.
आईचा मृत्यु झाल्या त्या दिवसापासून मी वेदाचा अभ्यास सुरू केला. एक आई गेली, तर दुस-या आईचा आसरा घेतला. 1918 ते 1968 ही पन्नास वर्षे आणि त्यानंतरही हा अभ्यास चालला.
मानसिक संशोधनाचे कामी तुकारामानें मला पुष्कळ मदत केली आहे. माझे आईच्या मधूर कंठातून तुकारामाचे अभंग मी ऐकले आहेत. त्याच्या स्मरणानेंहि आज माझे डोळे ओले होतात
सत्याग्रही बनण्यासाठी प्रथम सत्यग्राही बनायला हवे... सत्याग्रह म्हणजे आपला स्वत:चा अनाग्रह. सत्यालाच आपण आग्रह करू दयावा
ह्या पुस्तकातील शिक्षणविषयक मौलिक विचार सर्वांसाठी उद्बोधक आणि प्रेरक ठरतील.
आत्म - पर - श्रेयाची तळमळ हा या पत्रांचा स्थायी भाव आहे.. स्पष्ट शब्दांत, साध्या सरळ शैलीत शुध्द विचार सांगितला आहे. उत्कट भाव व्यक्त झाला आहे....
1923 साली महाराष्ट्र् - धर्म मासिकात उपनिषदांचा अभ्यास हया मथळयाखाली चार लेख मी लिहिले होते.
जे आर्ष शब्द रचलेले नसतात, अनुभूत असतात, त्या अनुभूत शब्दांत अणुशक्ति असते.
चिंतनातून प्रयोग आणि प्रयोगातून चिंतन अशी माझी जीवनाची घडण बसली आहे. हिलाच मी निदीध्यास म्हणता. निदिध्यासातून विचार स्फुरत राहतात.
प्रसिद्ध लेखिका कुसुम देशपांडे लिखित १९७३-१९८० या काळातील ‘विनोबा : अंतिम पर्व एक झलक’ हे पुस्तक.