List of books by Authors: B R Bhagwat | भा.रा. भागवत

भास्कर रामचंद्र भागवत  - 'भा.रा. भागवत'


हे बालसाहित्य लिहिणारे मराठी कादंबरीकार, पत्रकार, भाषांतरकारआणि विनोदी लेखक होते. ते 'भा.रा. भागवत' या नावानेच प्रसिद्ध होते. मराठीतील पहिल्या बाल-कुमार साहित्य संमेलनाचे (१९७६) अध्यक्षपद त्यांनी भूषवले. त्यांनी लहान मुलांसाठी - विशेषत: कुमार वयोगटासाठी - अनेक कादंबर्‍या व साहसकथा लिहिल्या. तसेच अनेक कथा, कादंबर्‍या व विज्ञानकथा यांची इंग्रजीतून भाषांतरे आणि रूपांतरे केली. त्यांनी 'ज्यूल व्हर्न' या प्रसिद्ध व आद्य-विज्ञानकथालेखकाचे संपूर्ण लेखन मराठीत भाषांतरीत वा रुपांतरित केले. त्यांनी निर्माण केलेले फास्टर फेणे आणि बिपिन बुकलवार हे नायक इ.स. १९७० आणि १९८० च्या दशकात प्रसिद्धी पावले. मुलांसाठी त्यांनी 'बालमित्र' हे नियतकालिक चालवले; तसेच 'पुस्तकहंडी'सारखे उपक्रमही केले.

Showing 1 - 10 of 10 items