कागद जाळता येतो पण शब्द जाळता येत नाही आणि तो आठवायचा नाही हा नियम मनाला पाळता येत नाही. ...माझे शब्द
शहाण्या सारखं वागायचा सल्ला लोकं गाठून मला देतात पण माझा वेडेपणा बघूनच ते माझ्यापाशी येतात...माझ्यापरीने मी
तहानलेल्या प्र्रजक्ताची गोष्ट आहे लिहायची सुरुवात अशी की त्या प्राजक्ताशेजारुन एक नदी संतपणे वाहायची. ...मनस्थित
लोटस पब्लिकेशन्सच्या दैनिक वृत्तपत्र प्रत्यक्षमधील मनोगत या सदरातील काही मनोज्ञ कथांचे संकलन.
लहानपणापासून आपल्याला प्रत्येक कथेतून एक बोध घेण्याची सक्ती केली जाते, कथेचा शेवट बोधाने होतो, ती प्रथा इथे मोडली आहे. फार साध्या सरळ माणसांची साधी सरळ कथानकं आहेत
पुसणांर कोणी असेल तर डोळे भरुन यायला अर्थ आहे कुणाचे डोळे भरणार नसतील तर मरण सुद्धा व्यर्थ आहे. ....“मी माझा”
वाडा जुना झाला म्हणून प्राजक्त जुना कसा होईल आणि प्राजक्त जुना म्हटला तर त्याला नवा बहर कसा येईल.... मी माझा २५...
शब्द अगदी माझ्याशी सख्ख्या मित्रासारखे वागतात अहो, कविता म्हणजे तरी काय शब्द दिल्या शब्दाला जागतात... मी नवा
कथाप्रकाराचं सामर्थ्य मला फार लहान वयात जाणवून दिलं ते ‘साधी माणसं’, ‘मानिनी’, ‘अन्नपुर्णा’, ‘उमेज पडेल तर’, अशा मराठी चित्रपटांनी. कथाबीज सुचणं आणि कथाप्रवास साधणं यांमधला फरक मला चित्रपट बघुनच जाणवला. तरी माझ्या कथालेखनाचं श्रेय माझ्या आईलाच देईन.
हल्ली मी आरशात पाहायचं टाळतो कारण नसते प्रश्न उभे राहातात हल्ली माझेच डोळे माझ्याकडे अगदी अनोळख्या नजरेने पहातात. .... “पुन्हा मी माझा”