वेगवेगळ्या विषयांवरील, वेगवेगळ्या धर्तीची अशी 1000 प्रश्नोत्तरे असलेला हा मनोरंजक संग्रह. या पुस्तकाचा उपयोग कोठल्याही सरकारी व इतर परीक्षेसाठी होईलच, त्याचप्रमाणे कोणत्याही वयाच्या व्यक्तिंना ज्ञान व मनोरंजन प्राप्त होईल.
जगभरातील सामान्यापासून असामान्यापर्यंत छाप सोडणा-या, प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या, योध्दा संन्यासी म्हणून ओळखल्या जाणा-या स्वामी विवेकानंद यांनी या संदर्भात काही विचार केला होता का? त्याचाच वेध घेण्याचा हा प्रयत्न.
‘आनंदध्वजद्वादशी’ कुणा आनंदध्वजाच्या उचापतीच्या बारा कथा असाव्या. अतिशय मेहनत घेऊन आम्ही त्या कथा लावीत आलो व जसजशा त्या लागल्या, तशा त्या मराठी वाचकांच्या सेवेस सादर करीत आलो.
वाचनाबरोबरच त्यांच्या मनावर उत्तम संस्कार होतील, अनुभव वाढेल, त्यांची मने संपन्न होतील अशा या कथा लेखक इंदुमती शिरवाडकर यांनी आवडत्या गोष्टी लिहिल्या आहेत. गोष्टी वाचताना गोष्टीतील पात्रांशी, गोष्टीतल्या प्रसंगांशी आपण एकरूप होऊन जातो. गोष्ट संपली तरी ती आपल्याला पुन:पुन्हा आठवते, आपल्या मनात घर करून राहते.
नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं अधिकाधिक स्त्री-पुरुष अधिकाधिक प्रमाणात एकत्र येणार....त्यांचे मैत्रीचे संबंध वाढणार....कधीकधी भावनावेगाच्या भरात जमिनीवरनं पायही सुटणार....! वाचून झाल्यावर दीर्घकाळ पदोपदी आठवत राहील, अशी एक धुंद कादंबरी....
चार मित्र-मैत्रिणींच्या चौकडीने केलेल्या धाडसी, शूर कामगिरीची कहाणी.
या पुस्तकात लेखक अविनाश कोलारकर यांनी अद्भुतरम्य अशा कथांतून चेटकीण, पक्षी, वनदेवता याचप्रमाणे घड्याळ, कॅलेंडर हे देखील कथानायकाशी हितगुज करताना दाखविले आहे. पर्यांच्या कथांतून मिळणार्या देणग्यांमुळे मुले निष्क्रिय न बनता प्रयत्नशील बनतील.
Aksharanshi Gappa is a best book for kids. Aksharanshi Gappa is written by Anil Awachat.
America By Anil Awachat. America is a best marathi book.
दि अमेरिकाज आणि अंटार्क्टिका... मानवनिर्मित आश्चर्य आणि नैसर्गिक आकर्षणे यांचा खजिना...नॉर्थ अमेरिकेतील युनायटेड स्टेट्स असो किंवा साउथ अमेरिकेतील ब्राझील, सेंट्रल अमेरिकेतील कोस्टा रिका असो किंवा जगाच्या तळाशी असलेला अंटार्क्टिका, अतिप्राचीन संस्कृतीपासून ते अत्याधुनिक खुखसुविधांपर्यंत अनेक पैलूनी पर्यटकांना साद घालणारी अमेरिका आहे.
एकदा उंबरठयावरचें माप कलंडून आंत गेल्यावर, ज्या काळी स्त्रियांनी उंबरठया बाहेर डोकावून पाहणेही मुष्कील असे, अशा काळांत कादंबरीकार श्री. ज. जोशी आपल्याला घेउन जात आहेत.
स्त्री-पुरुषातील मुग्ध, सलज्ज प्रणय़ ’अंधाराच्या पारंब्या’ या कादंबरीतून जयवंत दळवी यांनी चित्रीत केला आहे.
अंक एकांक प्रेमानंद गज्वी यांच्या एकांकिकांची समीक्षा
Why not try some of these recipes at home and share the joy of cooking? You will surely do it sometime, because you care for your family. One who cooks with care, thinks likewise. Indians are spread all over the world now and like Chinese or French cuisine, Indian cookbooks are becoming a rage with the connisseurs. Annapurna the original Marathi book has...
विषयाचा प्रदीर्घ व्यासंग, विस्तृत अनुभव आणि कणाकणाने गोळा केलेले ज्ञानाचे समृध्द भाण्डार यांच्या आधाराने सिध्द झालेला हा ग्रंथ नव्या-जुन्या गृहिणींना सतत हाताशी ठेवावा, असाच आहे.
जीवनाला लपेटून राहिलेल्या, अशा कितीतरी गहन गूढांवर, गुंगवून टाकणार्या, समग्र जीवनाचा खोलवर विचार करायला लावणार्या कथा.
सर्व लेखनात विश्वबोधाच्या आणि सभोवतालाच्या सखोल जाणिवेचा समतोल आहे. माहितीचे नेमकेपण, थक्क करणा-या अंतदृष्टीच्या व प्रज्ञेच्या जागा आणि अंतर्मुख करायला लावणारे थांबे आहेत.
समर्थ नाटककाराचे समर्थ दिग्दर्शकाला आव्हान महाभारतावरील हे नाटक.विषय,प्रकृती,बांधणी,आशय,छंद,संकल्पना या सर्वच बाबतीत वेगळे.
मृत्यूनंतर आपले काय होते याची जिज्ञासा आपणा सर्वांनाच असते. याच जिज्ञासेतून ’आरसा’ हा कथासंग्रह जन्माला आला आहे.थोडक्यात सांगायचे झाले तर हा कथासंग्रह म्हणजे मृत्यू नंतरच्या अज्ञात सृष्टीचा घेतलेला हा वेध आहे.
पु. ल. देशपांडे यांच्या ‘असा मी असा मी’ या पुस्तकावर आधारित दोन अंकी नाटक
माणूस वर्तमानात जगतो, भविष्याचं स्वप्न पाहतो आणि अधूनमधून भूतकाळात शिरुन आठवणींचे अल्बम चाळतो. हा असाच आठवणींचा अल्बम आहे.
आयुष्याची छोटी गोष्ट या संग्रहातल्या काही कथा माणसाचा आणि त्याच्या आत्मशोधाचा वेध घेण्याचा प्रयत्न करतात शोध संपणारा नसतो माणसाच्या जिण्याबद्दल आणि त्याच्या अंतरविश्वाबद्दलच कुतुहलही संपणार नसत म्हणून या काही कथा शोधातल्या प्रवासातल्या
मंदार अनंत भारदे यांच्या लेखांचा सग्रह.
ब्रिटनमधील सरोवराच्या प्रदेशातून केलेली ही संवेदनशील मनाची प्रसन्न सफर आहे. छोटया छोटया निरिक्षणातून गवसलेले भव्य अर्थ आहेत
बैठकीच्या कहाण्य़ां मध्ये निरनिराळ्या देशांमधील प्रातिनिधिक व्यावसायिकांबरोबर झालेल्या बैठकांच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणच्या वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वास्तवाचे चित्रण केले आहे.
विजय पाडळकरांचे हिंदी चित्रपटातील गीतकारांचा मागोवा घेणारे नाविन्यपूर्ण पुस्तक.
लेखक रमेश मुधोळकर लिखित अरेबियन नाईट्स मधील कथा.
स्वराष्ट्र निर्मितीसाठी ज्या असंख्य बालवीरांनी आपल्या प्राणांचीही पर्वा न करता मुक्तिसंग्रामात उड्या घेतल्या आणि आपल्या नेत्यांचे शोनार बांगलाचे स्वप्न साकार करण्यात हातभार लावला त्या बंगलाच्या बालवीरांच्या त्यागाच्या आणि पराक्रमाच्या कथा.
दरवाजांच्या बंद होण्यामागे काही सूचन असते कथा आणि हकिकतही असते बंद जरी झाले असले तरी दरवाजांच्या उघडण्यातच त्यांचे प्रयोजन असते आणि बंद दरवाजे उघडण्यासाठीच असतात हे सूचन समजून घ्यावे लागते त्या अनुषंगाने या काही कथा येथे घेतलेल्या आहेत
बाबाजींच्या सुरस कथा आणि इतर लेख, या संग्रहात भेटणारे लेखक हे व्यवसायाने व्यवस्थापन-शास्त्रज्ञ, विशेषत: मनुष्यबळ विकास, याबबतींत त्यांनी अनेक संस्थांना मार्गदर्शन केलं आहे.
‘बिहाइंड दि मास्क’ हे एका कुशल आणि संवेदनशील शस्त्रक्रिया-तज्ज्ञाचे आत्मनिवेदन आहे. अनुभवांचे विविधरंगी पदर डॉ. मुंजे यांनी इथे मोठ्या दिलखुलासपणे उलगडून दाखविले आहेत.
या पुस्तकात जयवंत दळवी यांच्या निवडक कथा, कादंबरी व विनोदी लेखन यांचा समावेश आहे.
हा भालचंद्र नेमाडे यांचा सर्वांगीण परामर्श घेणारा ग्रंथ आहे.त्याचे संपादन विलास खोले यांनी केले आहे.
हे पुस्तक वाचताना कधी आपण म्हणू की,मराठी भाषा म्हणजे एक ’भयंकरच प्रकरण’ आहे, तर कधी असेही म्हणू की ’मराठी भाषे इतकी सुंदर नि गोड भाषा अख्या जगात नाही.
बिंब-प्रतिबिंब, परिशिष्टातील व्हॅन गॉग: अखेरचे पर्व, पिकासो नावाचे गारुड, अमृता शेरगीलचे श्रीमंत पेंटिंग, एका विक्षिप्त प्रतिभावंताची रोजनिशी हे आणि इतर अनेक वाचनीय लेख.
मी दैनिक ‘सामना’मध्ये लिहीत असलेल्या ‘भटकेगिरी’ ह्या सदरातल्या लेखांचा हा संग्रह आहे.
गप्पांना विषयाचं बंधन नसतं. अड्डा जमला की मजेशीर गोष्टींची चौफेर आतषबाजी होते. मनुष्यस्वभावाची गंमत म्हणजे जे मत काहीजणांना भावतं ते काहींना चावतं.
भा. रा. भागवत यांच्या जादुई भाषेमुळे ही कादंबरी बालवाचकांना झपाटून टाकते.
या संग्रहात सगळ्याच कथा काही विज्ञानकथा नाहीत;नर्मविनोदी शैलीतल्या,औद्योगिक विश्वात घडणाऱ्या कथाही आहेत.
मध्यमवर्गीय मराठी साहित्याला एका नव्या अनुभवविश्र्वाची जोड शफ़, सफाईदार आणि सामर्थ्यशील शैलीने मिळवून देणारी ही कादंबरी
रत्नाकर मतकरी लिखित या नाटकात जाचक वास्तव आणि मुलांचे मनोबल यांच्यातील संघर्षाची ही कहाणी अनेक नाट्यपूर्ण प्रसंगांनी आणि चमत्कारांनी भरलेली, नाच, गाणी, विनोद यामुळे रंजक झालेले हे नाटक बालक-पालक या दोघांनीही पाहिलेच पाहिजे असे आहे. यात मुलांसाठी गंमत व पालकांसाठी संदेश आहे.
सामंतानी टिपलेले सारे तपशील अचून ऎतिहासिक आहेत, आणि ते त्यांनी अभ्यासाने गोळा केलेले आहेत. यामुळे ‘चंदेरी स्मृतिचित्रे’ वाचनीय होतात आणि जुन्या जमान्यातील माहितीचा प्रचंड खजिना रसिकांपुढे उघडला जातो.
पिकविक पेपर्स : ऑलिव्हर ट्विट डेव्हिड कॉपरफील्ड : ए टेल ऑफ टू सिटीज या कादंब-यांनी पाश्चात्य साहित्यविश्वात अजरामर झालेल्या चार्ल्स डिकन्सने कादंबरीकार म्हणून मानाचे स्थान मिळवले.
ह्या पुस्तकामध्ये सर्वांच्याच पसंतीला उतरणारा बटाटा लेखिकेने खुपच अभ्यासुन लिहिला आहे.
अनिल अवचट यांनी स्वत:च्या अनेक छंदांविषयी या पुस्तकात लिहिले आहे. त्या प्रवासात त्यांना गुरु कसे भेटले, छंदांचा आनंद लुटून त्यांचे आयुष्य कसे समृद्ध झाले, त्याचे प्रत्यक्ष अनुभव. Anil Awachat have lots of hobbies. Chhandanvishayi is book of their numbers of hobbies.
या दोन खारींनी केलेल्या धम्मालीची ही कथा. शेपटीचा झुबकाही पुरा फुलला नव्हता पण मेंदू अत्यंत तल्लख. आपल्या आईबरोबर एका घराच्या वळचळणीत राहतात. पण आईच्या नजरेआड झाली की त्यांना नुसता ऊत येतो. घरात जाऊन टेलिफोन काय करतात, थंडीने काकडाली की शेपटी काय पेटवतात, चिऊताईचं पाहून उडायला काय लागतात. अशा त्यांच्या अनेक धम्मालींची ही कथा.
सचिनची कारकिर्द ही क्रिकेटच्या इतिहासातलं एक महाकाव्य आहे.. पहिल्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या इम्रान, अक्रम, वकार हया त्रिकूटाच्या वणव्याशी सचिन झुंजत होता
प्रत्येक व्यक्तीला आपल्या बालपणी शाळेत शिकलेल्या व ऐकलेल्या बालकविता मुखोद्गत असतात. जसे बालपण विसरता येत नाही. तशा या कविताही विसरता येत नाहीत. या बालकविता प्रौढावस्थेतही आनंद देऊन बालविश्वात घेऊन जातात.
हे पुस्तक दिग्दर्शनाच्या अत्यंत बेसिक्सबाबत बोलणारं पुस्तक आहे. एखादं नाटक करायचं ठरवल्यापासून ते पहिल्या प्रयोगापर्यंत जात तेव्हा काय काय गोष्टी दिग्दर्शकाच्या दृष्टीने महत्वाच्या असतात, त्याला काय काय करावं लागतं
मानवी मनाचा तीक्ष्ण छेद घेत नर-मादी संबंधातील आभास बिनदिक्कत ठोकरणाऱ्या, आजच्या आत्मभानाचं उद्याशी नातं जोडणाऱ्या,लेखकाच्या लक्षवेधी कथा! च्यास त्रीच्या आत्मभानाचंउद्या
देवराई’ या चित्रपटाचा रसास्वाद आणि निर्मिती या निमित्ताने समोर येणा-या मानसिक, वैद्यकीय घटकांचा मागोवा...मनोरुग्णांची व्यथा सांगणारा, त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदनेचा आणि सामर्थ्याचा आलेख रेखाटणारा...एक लेखनप्रयोग, ’ ’देवराईच्या सावलीत’.
ज्ञानसा नाईक यांनी लिहिलेल्या बाबी नावाच्या मुलीच्या धाडसी कथा.
कोकणातल्या एका जमीनदार सारस्वत कुटुंबाची जीवघेणी वाताहत सांगणारी ही कादंबरी आहे.
Dharmik marathi book is a diffrence between faith and superstition. In India Hindu, Muslim and Chrstian relegion and there superstition.
आई आणि मुलीच्या नात्याची अशी काही परिमाणं वाचकांसमोर ठेवणारी ही कादंबरी तिच्या आशयाप्रमाणेच निवेदन-बंधामुळेही लक्षणीय झाली आहे.
आई-मुलगी या सनातन नात्यानं एकमेकींशी घट्ट बांधल्या गेलेल्या शारदा,नंदिनी आणि आभा! त्यांच्या तीन पिढ्यांच्या निमित्ताने काळाचा एक काहीसा मोठा पट इथे उभा राहतो.
‘दिल, दोस्ती... डॉक्टरी’ ही नॉव्हेल ऑफ फॉर्मेशन या सदरात मोडणारी कादंबरी आहे.
प्रत्येक कामगार, कर्मचारी, अधिकारी, व्यवस्थापक, उद्योजक यांच्याकडे असायलाच हवे असे पुस्तक.
ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य जगातील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. भारतात मान्यताप्राप्त बाबीस भारतीय भाषा आहेत. या भाषांपैकी एका भाषेतील सर्वोत्कृष्ट साहित्याचा दरवर्षी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मान करण्यात येतो
एका शोधक, खट्याळ नजरेनं टिपलेलं व मिश्किल लेखणीतून उतरलेलं असं हे अनुभवकथन आहे.
भारत सासणेंच्या कादंबर्या
जीएंच्या पत्रसाहित्यावर आधारलेली एक धारवाडी कहाणी । (जी.एं.च्या साहित्याप्रमाणे) आनंद अंतरकर यांच्याच शब्दांत ‘जी.एं.चं पत्रसाहित्य वाचणं हा उच्च प्रतीचा आनंद तर आहेच; पण पुढीलांच्या वाड्मयीन अभ्यासासाठी तो उपयुक्त आणि मोलाचा आहे.
क्रिकेट, चित्रपट, संगीत, विनोद, ललित या विविध क्षेत्रांत त्यांची लेखणी समशेरीसारखी तळपते आहे. त्यांच्या लेखनातील ही वेचक, गाळीव रत्ने!
संझगिरींचं लिखाण हाच मुळी इंग्लिश हवामानासारखा ऊन-पावसाचा खेळ आहे. असा हा अनुभव.
२८ देश.. १२० शहरं... २५ भाषा... ८७ वंश... ३४ विश्व वारसा स्थानं... या सगळ्यांनी मिळून होतो युरोप. Europe is a best Tourism book by Veena Patil. Europe book gave us information about great Europe culture.
१८९३ साली मोहनदास गांधींनी दक्षिण आफ्रिकेसाठी प्रस्थान ठेवले त्यावेळी ते २३ वर्षांचे होते. तिथे त्यांनी जी दोन दशके घालवली त्यातून एक महात्मा घडला.
गांधी, विनोबा आणि जयप्रकाश मिळून विसाव्या शतकातील भारतीय विचारदर्शनाचा आणि सामूहिक कृतीचा एक भव्य आलेख समोर येतो.
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच इतिहास ( दहा वर्षानंतरची अद्द्यावत आणि वाढवलेली आवृत्ती)
अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे श्रेष्ठ कलावंत गुलजार यांच्या सिनेदिग्दर्शकीय प्रवासाचा आलेख मांडणारे सुप्रसिध्द ललित लेखक व चित्रपट समीक्षक विजय पाडळकर यांचे नवे पुस्तक.
भारताच्या इशान्य भागातील राज्यांमध्ये 1976 पासून मेंदूच्या मलेरियाने उग्र रूप धारण केले होते. त्याच्या प्रतिबंधासाठी भारत सरकारने इतर राज्यांतून काही निवडक अधिकारी त्या भागात पाठविण्यात आले. त्यात लेखक राजा लिमये यांची निवड झाली होती. गारोंच्या जंगलातील चित्तथरारक, मनोरंजक घटना एक तरुण जोडप्याच्या जीवनातील घटनांमध्ये गुंफून मांडली आहे.
ललित या मासिकात तीन वर्ष चालु असलेल्या ग्रंथगप्पा या सदरातील लेखांचे केलेले संपादन.
सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी लिहिली गेलेली ‘इलियड’ व ‘ओडिसी’ ही दोन महाकाव्ये युरोपीय परंपरेतील आद्य, अभिजात साहित्यकृती आहेत.
आपल्या सर्वांगीण जीवनात या तत्त्वज्ञानाचा दबदबा राहावा अशाच दॄष्टीने समाजशिक्षकांनी रामायण-महाभारताचे संस्कार केले आहेत.
Hameed book is a story of muslim social worker Hameed Dalwai. Hameed marathi book is written by Anil Awachat.
व्यंगचित्रकार हरिश्चंद्र लचके यांच्या या विनोदी चित्रसंग्रहात मुलांसाठी सोपे व बाळबोध विनोद व मुलांच्या जगातील आणि मुलांसंबंधीत आहेत.
लेखिका रेचल गडकर यांनी लिहिलेल्या लहान मुलांच्या धाडसी कथा.
‘पर्यावरणाचा तोल राखणारं सर्वोत्कृष्ट हॉटेल’ म्हणून मिळालेलं आणखी एक, अत्यंत मानाचं बक्षीस घेऊन मी ‘ऑर्किड’ मधल्या माझ्या राखीव स्वीटमध्ये परत आलो. सर्वसाधारण खानपानगृहवाला, ते ‘ऑर्किड’ सारख्या असाधारण पंचतारांकित हॉटेलचा मालक, हा माझा प्रवास पूर्ण झाला होता. हे स्वप्न नव्हतं. ही स्वप्नपूर्ती होती.
या कथांमधून आजच्या समाजजीवनातील अधोगतीचे चित्रण, भरगच्च तपशिलासह केलेले आहे.
ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाचे वाचन उद्ध्वस्त मनाला शांती देण्याचे काम जसे करते तसेच इसापनीतीच्या गोष्टींचे वाचन अडचणीच्या प्रसंगी मार्ग दाखविण्याचे काम बिनचूक करते. त्यामुळे या गोष्टींचा उपयोग जसा मुलांना होतोे तसाच तो प्रौढांचा व्यवहारनीतीचा मार्गदर्शक म्हणून अधिक व्हावा हेच योग्य होय.
ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाचे वाचन उद्ध्वस्त मनाला शांती देण्याचे काम जसे करते तसेच इसापनीतीच्या गोष्टींचे वाचन अडचणीच्या प्रसंगी मार्ग दाखविण्याचे काम बिनचूक करते. त्यामुळे या गोष्टींचा उपयोग जसा मुलांना होतो, तसाच तो प्रौढांचा व्यवहारनीतीचा मार्गदर्शक म्हणून अधिक व्हावा हेच योग्य होय.
पंढरीनाथ रेगे यांनी लहान मुलांसाठी साध्या-सोप्या भाषेत लिहिलेल्या रामायणातील गोष्टी.
जादू या कलेची तोंडओळख व परिचय करून दिला आहे जादूगार विरेंद्र यांनी. जादूसंबंधी गैरसमज दूर करणे, त्यांची ऐतिहासिक व सामान्य माहिती मिळविणे, जादू आणि शास्त्र यांचा संबंध स्पष्ट करणे यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
जगन, नाथ व लहान मित्रांच्या धाडसी कथा.
अभ्यासाची एक वेगळी जाण देणारा हा पूर्ण प्रवासाचा आलेख एका वेगळ्या दुनियेचं दर्शन घडविणारा आहे. ’हाय पावर’ या माहितीपटाचा जैतापूर ते फ्रान्स हा रोचक प्रवास त्यातील खाचा-खळग्यांसह, अडथळ्यांसह प्रभावीपणे साकार करणारे विलक्षण पुस्तक.
वास्तवावर आधारित असणे ,हे आज कथेसाठी विशेष महत्वाचे ठरत असल्याने कथेतून वृत्तांताचा मारा होतो आहे.कथा हे वास्तवाचे पुनर्लेखन नसून त्याचा पुढचा टप्पा असतो,याकडे दुर्लक्ष होत आहे.
चिकाटी, एकाग्रता, एकजूट धैर्य, साहस, देशप्रेम व त्याग या गुणांची महती सांगणारा हा प्रवास भारत सासणे यांनी मनोरंजन तसेच चांगले संस्कार याची जाणीव ठेवून लिहिलेली ही कादंबरी.