आदिवासी भागाचा विकास व्हावा अशी प्रामाणिक इच्छा आहे म्हणुन हा अल्पसा प्रयत्न केलेला आहे.
आंबेडकर भारत : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला भारत त्यांनी या पुस्तकातून दिलेला आहे. श्रुती आणि स्मृतींनी सांगितलेल्या धर्माचा उच्छेद केला तरच खरी लोकशाही या देशात स्थापित होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या क्रांतिगर्भ तत्त्वज्ञानाने दलित कलावंत आणि दलित माणूस आमूलाग्र बदलला. एकोणिसाव्या शतकाच्या तिस-या दशकापासूनच दलित कलावंत आंबेडकरनिष्ठ विचार घेऊन गावागावांत गेला.
अनिष्टप्रथा : अंधश्रद्धा किंवा अनिष्ट प्रथा या बदलत्या काळानुसार नव्या चेहर्याने पुढे येतात. त्यांची दखल घेऊन त्यांच्याविरोधी प्रबोधन करणे, या प्रथांचे स्वरूप स्पष्ट करणे आवश्यक आहे. अंधश्रद्धांविरूद्ध लढणार्या मंडळींना अधिक बळ मिळण्यासाठीही अशा पुस्तकांची आवश्यकता आहे.
बळीराज्य वा ब्राह्मणेतर चळवळीचे पुनरुज्जीवन : ब्राम्हण मग तो कुठल्याही पक्षाचा वा विचारसरणीचा असो, तो आपला परकीय आर्यवंशवाद व्यवस्थित जपतो. त्यासाठी तो परस्परभिन्न विचारसरणीचा त्यासाठी मोठ्या चलाखीने वापर करतो. याबाबतचे राजकीय अकलन या पुस्तकात मांडले आहे.
कोणत्याही समाजाच्या प्रश्नांचा विचार करीत असताना त्यांच्या समाजजीवनाकडे निगडीत असतात. म्हणून किमान त्यांच्या जगण्याची ओळख होणे आवश्यक वाटते.
दलित मुसलमान : मुस्लीम कुटुंबाच्या आशयपूर्ण सर्वेक्षणाच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या पुस्तकात त्यांच्या दु:खाचे कारण आणि त्यावरचे उपाय काय आहेत हे सांगितले आहे.
दलित साहित्याचा आढावा घेणारे, त्यातील अनेक प्रवाहांचे व उपप्रवाहांचे स्वरुप स्पष्ट करणारे, त्यांच्यामागील प्रेरणांचे विश्लेषण करणारे जे निवेदन त्यांनी ह्या संग्रहाला जोडले आहे.
महान सत्यशोधक विचारवंत दिनकरराव जवळकर यांनी 'देशाचे दुश्मन' हे क्रांतीकारी पुस्तक लिहिले.
देवदासी शोध आणि बोध : या पुस्तकात श्री. वसंत राजस् यांनी देवदासींचे पुनर्वसन या अंगाने चाललेल्या प्रयत्नांचा वेध घेतला आहे. या पुस्तकात ते तपशीलवारपणे व श्रेयस्कर झाले आहे.
हा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या राज्यघटनेच्या प्रारुपसंबंधी आणि प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या राज्यघटनेसंबंधी भारताच्या सामाजिक इतिहासाच्या पाशर्वभूमीवर चर्चा करणार आहे.
गीतातत्त्वज्ञानाची उलटतपासणी : गीता वाचताना लक्षात येते की प्रत्येक अध्यायात मानवी जीवनाला उपयुक्त असणारे काही श्लोक त्यात आहेत, परंतु ते ज्या संदर्भात व विषयांना धरून आले आहेत त्यात भरपूर विसंगती आढळून आली आहे. त्यामुळे भगवद्गीतेतील या श्लोकांच्या अर्थाची चिकित्सा या पुस्तकात करण्यात आली आहे.
"झोत' हे कसबे यांचे एके काळी खूप गाजलेले पुस्तक. त्यावरूनच "झोत - सामाजिक न्यायावर' असे ग्रंथनाम योजिले आहे. न्यायमूर्ती पी. बी. सावंत, डॉ. गोपाल गुरू, डॉ. आ.ह. साळुंखे, गोविंद पानसरे, राजेंद्र व्होरा, आनंद तेलतुंबडे, भास्कर कोळे यांसह एकूण पंधरा विचारवंतांचे लहान-मोठे लेख यात आहेत.
रा.शे. साळुंके यांनी अतिशय परिश्रमपूर्वक खानदेशातील महारांचा सांस्कृतिक इतिहास सिद्ध केला आहे. गतकाळातील समाजव्यवस्था, त्याचे सूक्ष्म तपशील जीर्ण मूल्ये आणि नवी मूल्ये यातील संघर्ष हे या साळूंके यांच्या ग्रंथात आहे.
लोकशाहीला धोके : लोकशाहीतील खाचखळगे दाखवून देण्यासाठी व सद्भावाना आणि व्यावहारिक शहाणपणा असेल तर ते टाळणे कसे शक्य आहे हे सूचित करण्यासाठी लोकशाही या बहुरंगी शब्दाचा अर्थ हे स्पष्ट करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
या पुस्तकात महाभारतातील काही आगळ्यावेगळ्या स्त्रियांच्या जीवनातील वैशिष्ट्यपूर्ण घटनांचे विवेचन केले आहे.
महिलांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन : स्त्रियांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन पावलोपावली होताना आढळते. त्याची जाणीव बहुतेक स्त्रियांना नाही. फक्त पुरुषच नाहीतर स्त्रियांदेखील स्त्रियांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन फार मोठ्याप्रमाणावर करतात. असे कित्येक प्रकार सर्वांसमोर आणण्याचा हा प्रयत्न.
शांताबाई कांबळे स्वत:च सांगताहेत आपल्या आयुष्याची ही चित्तरकथा.
हा ग्रंथ माणूस प्राणीसृष्टीतून मानवी सृष्टीत का आणि कसा आला असा प्रश्न उपस्थित करुन सुरु होतो आणि मानवी विकासक्रमातील कुलयुगाच्या अंताच्या तपशिलाने तो संपतो.
बौध्दधर्म दर्शन व मराठी संत साहित्याचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रेरणेतूनच "मराठी संत साहित्यावर बौध्द धर्माचा प्रभाव" हा प्रबंध साकार झाला.
या ग्रंथात संशोधकाची महत्ता आणि चिकित्सेची शिस्त त्यांना उत्तमरीतीने अवगत आहे, असे लक्षात येते.
मिटलेली कवाडे : दलितांचे जीवन, त्यांच्यात होणारी चुकीची समाजसेवा, हानीकारक अलिप्तपणा, समाजसेवेचा चुकीचा दृष्टिकोन, खर्या गरजा आणि उणिवा यांचे दर्शन घडले आहे आणि त्यासाठी लेखिकेने अनुभवलेले प्रसंग या पुस्तकांतून दिले आहे.
महाराष्ट्रातल्या सफाई कामगारांची पहाणी सुरु केल्यावर आपण एक नवा प्रश्न हातात घेतला म्हणून आनंद व्यक्त केलात आणि समाजासमोर हे अनुभव लवकरात लवकर पोहोचावे असाही आपला आग्रह होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर :नियोजन, जल व विद्युत विकास भूमिका व योगदान-अनेक वर्षांपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या एका क्षेत्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अतुलनीय कामगिरीविषयी हे पुस्तक जाणीव करून देते.
आपल्या भारतीय समाजाला आज खरी गरज कशाची असेल तर ती गतिशील परिवर्तनाची! काही जाणती माणसे ते करीतही आहेत.
या ग्रंथामुळे बुध्द धर्माच्या अभ्यासकांची गरज दूर होईल.
सबलीकरण म्हणजे बल वाढवणे, या ग्रंथाचा मुख्य हेतू आहे. विविध प्रकारचे सामाजिक, आर्थिक व राजकीय कार्य करणार्यांना व अशा कार्यात रस असणार्यांना याचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा आहे.
कार्तिक वद्य १३ शके १२१८ या तिथीस श्रीक्षेत्र आळंदी येथे श्रीज्ञानदेवांना नैसर्गिक मृत्यु आला व त्यांच्या पार्थिव देहाला स्थलसमाधी देण्यात आली. त्यांना नैसर्गिक मृत्यु आला असताना त्यांनी जिवंत समाधी घेतली आहे अशी कल्पना आज रुढ आहे. सांप्रदायिक पूर्वग्रहाशिवाय या पुस्तकाचे मूल्यमापन व्हावे जिज्ञासूंनी या दिशेने विचार करण्यास प्रवृत्त व्हावे हा उद्देश.
‘तमाशा’ ही मराठी माणसांची कला अहे.तमाशा म्हणजे मुक्तनाट्य.
तंट्या भिल्ल : तंट्या हा एक दरोडेखार होता, कायद्याने तो गुन्हेगार होता. असे असूनही जनतेची, वर्तमानपत्रांची त्याला सहानभूती होती. त्याला फाशी होऊ नये म्हणून वकिलांनीसुद्धा प्रयत्न केले. तो कायद्याने गुन्हेगार होता तरी माणूस म्हणून त्याच्यात काही उच्च कोटीचे गुण होते.
विठ्ठालाचा नवा शोध : श्रीविठ्ठल ही बहुजनीय व्यक्ति होती. त्यांना दैवप्रतिष्ठा लाभली, एवढेच नव्हे तर ते त्रिखंडी दुमदुमली. या छोटेखानी पुस्तकात त्यांचा उलगडा केला आहे.