या ग्रंथात एकूण तीस व्यक्तिचित्रे आहेत. विशिष्ट धेयवादाने कार्यरत असणार्या आणि आदिवासी वंचित समूहाला नव्या दिवा देण्याचे काम ज्या समाजधुरीणांनी केले, त्यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा आलेख ह्या ग्रंथात वाचायला मिळतो.
महाराष्ट्राच्या लोककला,लोकभूमिका आणि लोकगीते यातून उभी राहिली ती महाराष्ट्राची लोकसंस्कृती
आबा नावाचा चमत्कार नेमका काय होता हे पुढच्या पिढयांना कळावं म्हणून इंद्रजित भालेराव यांनी हे पुस्तक संपादित केले आहे
ग्रामीण माणसाची जीवनशैली आणि तिथे नांदणारे आत्मतृप्त जग गेल्या शतकात नांदत होते ,याची जाणीव करून देणारे हे लेख आहेत
महाराणी ताराराणींच्या कर्तुत्वांवर आधारलेले हे पुस्तक आहे..
जगदीश खेबुडकर यांचा भक्तीगीतांचा संग्रह "भक्तीचा मळा".
Dr Harivansh Rai Bachchan , हिंदी साहित्यातील एक बहुरंगी व्यक्तीमत्त्व. हालावादी कवी, शैलीदार गद्यलेखक, यशस्वी अनुवादक, साक्षेपी संपादक, इंग्रजीचे प्राध्यापक, केंब्रिज विद्यापीठातून इंग्रजीची डॉक्टरेट मिळणारे पहिले भारतीय, संसदसदस्य, अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी. त्यांची ही कहाणी.
शहरीकरणाचं आक्रमण हा या कादंबरीचा विषय आहे
मा.यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनातील हृदयस्पर्शी घटनांवर आधारित अनेक मान्यवरांचे लेख असलेले हे पुस्तक .
पाकिस्तानातील साराची वेदना अमृता प्रीतम यांनी दिल्ली ) पर्यंत आणली होती .ती मराठी वाचकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न संजीवनी तडेगावकर यांनी केला आहे .
Gautam Buddha by Ajit Patil | गौतम बुद्ध लेखक - अजित पाटील.
जवळपास १५०० मौल्यवान बोलीभाषेतील शब्दांचा शब्दकोश
बंडा जोशी यांचा विनोद कुणालाही जखमा करणारा किंवा बोचकारणारा नाही,तर गुदगुल्या करून हसवणारा आहे.
हिरवा सण ही कादंबरी १९३० ते १९३५ या कालखंडामधे प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवर आधारलेली आहे.
उर्दू ही अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी भाषा आहे.तिच्या विकास आणि प्रचारास सुफी संत कवींचे फार मोठे योगदान आहे.
एका संवेदनशील लेखकाच्या लेखणीतून उतरलेले ,सामाजिक जिव्हाळ्याचे प्रश्न मांडणारे हे पुस्तक
जगातील सर्वोत्ताम राजा छत्रपती शिवाजी महाराज । काशिनाथ मढवी - शिवसूक्ते - अरुण म्हात्रे । महाराजांच्या श्रेष्ठत्वाची १०० गुणवैशिष्टे प्रसंगासह असणारे एकमेव पुस्तक
विसाव्या शतकातील महाराष्ट्रात होऊन गेलेल्या गेलेल्या थोर साहित्यकारांमध्ये र. वा. दिघे हे नाव अग्रगण्य आहे.
नात्यांनीच नात्याला अडवल्याचा,शेतकऱ्यांनीच शेतकऱ्यांना आटवल्याचा अन संबंधित निगरगट्ट नोकरशाहीनंही त्यांनाच नागवल्याचा वृत्तांत कथन करणारी वास्तववेधी कादंबरी
वि. दा. पिंगळे लिखित क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांचे चरित्र.
Lokshahir Anna Bhau Sathe by Shankar Dinakar Kavale
ही गोष्ट आहे एका पक्षिणीची. घरटे नसलेल्या पक्षिणीची . त्या पक्षिणीला डौलात फिरायचं एवढंच ठाउक
कवी कुलगुरू महाकवी कालिदासाच्या जीवनावरील स्वतंत्र कादंबरी
मराठ्यांच्या इतिहासात येसूबाईंचा त्याग अपूर्व आहे. त्यांनी स्वराज्य, स्वधर्म आणि स्वातंत्र्य यासाठी आपले सारे जीवन वेचले. मराठेशाहीच्या इतिहासात आपल्या गुणांच्या जोरावर प्रकाशमान झालेली ‘राज-स्त्री’ म्हणजे येसूराणी.
Makadhad.com by Santosh Gonbare | नीतिकथांचे माधुर्य प्राजक्ताच्या सड्याप्रमाणे सात्त्विक आहे, कारण त्यातून प्रतीत होणार तात्पर्यभाव प्रवृत्तींचा अक्षरगंध पसरवतो. ह्या बालकथा निश्चितच नव्हेत, बालपणात शिकलेले नीतिकथांचे तात्पर्य विसरुन माणूस उद्दाम वर्तनास उद्युक्त होतो, त्या वयापासून ह्या कथा सुरु होतात !
सृजनाची अनेक रुपे एकाच व्यक्तिमत्त्वात एकवटलेली असा अनुभव देणारी माणसे फार दुर्मीळ असतात.
गावगाड्यातील मुस्लीम बारा बलुतेदारांची स्थिती,दुर्गती आणि मागासलेपणाचा सखोल अभ्यास वेगळचं विदारक वास्तव दर्शवतं.
रक्ताला चटावलेल्या भूमीची अंगावर शहारे आणणारी करुण कहाणी !
जीवनातील अनेक कठीण परीक्षांना सामोरे जाऊन तीन महात्मे कसे थोर शास्त्रज्ञ बनतात आणि जगात मान्यता पावतात याची ही कहाणी आहे
ऑलिम्पिक हा विषय मुळातच आकाशाएवढा मोठा आणि त्याचा स्पर्धात्मक भाग पाहिला तरी तोही महाभारता एवढा विशाल. अश्या अभूतपूर्व, अपूर्व अद्भूत ऑलिम्पिकच्या कुंभमेळयात युवा लेखक संजय दुधाणे यांना लंडन पाठोपाठ रिओ ऑलिम्पिकमुळे सलग दुस-यांदा सहभागी होण्याचे भाग्य लाभलं.
‘पानगळ या नवीन पुस्तकात मिलिदं जोशी यांच्यातील कथाकाराचे उत्कटतेने दर्शन घडते. या कथासंग्रहातील बहुतेक कथा या अस्वस्थ माणसांच्या अनुभवातून स्फुरलेल्या असल्या तरी या कथांमध्ये अभिव्यक्त झालेले अनुभव हे एकसुरी नाहीत.
ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तत्त्वज्ञान आणि काव्य यांचा मनोज्ञ संगम आहे.
लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांची जीवनगाथा गाणारं हे पुस्तक म्हणजे चरित्रलेखनाची उत्तम पावती आहे.प्रा.चंद्रकुमार नलगे यांनी अत्यंत रसाळ भाषेत पठ्ठे बापूराव आणि पहिली स्त्री कलाकार पवळा हिच्याविषयी लिहलं आहे
लेखक र. वा. दिघे लिखित "पूर्तता" कादंबरी आहे.
स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांचे जीवनचरित्र म्हणजे समस्त मराठेशाहीची स्वराज्याची वाटचाल होय.
साहित्यकृतीचे माध्यमांतर अभ्यासताना आपणास साहित्य वा माध्यम ही वेगवेगळी माध्यमे असून आपल्या विचारांना अभिव्यक्त करत असताना चित्र, शिल्प, कथा, कविता, कादंबरी, नाटक, मालिका सिनेमा या माध्यमातून मानवी जीवन प्रदर्शित होत असते.
या पुस्तकात साहित्य क्षेत्रातील नामवंत साहित्यिकांची व्यक्तिचित्रे समाविष्ट केली आहेत
संतसाहित्य म्हणजे अध्यात्म, परमार्थ आणि निवृत्ती असेच चित्र आजच्या पिढीच्या मनात आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या आजच्या युगातल्या सर्व नव्या संकल्पना संतसाहित्यात सापडतात.
या कविता संग्रहात संवेदनशील कवयित्री आश्लेषा महाजन यांनी शाळेची विविध रूपं, शिक्षक-विद्यार्थी यांचं नातं या विषयांवरील अनेक कविता आहेत.
`शेतकरी नवरा' ही आजच्या शेतकरी जीवनाचे दाहक वास्तव नजरेसमोर आणणारी वेगळ्या स्वरूपाची कादंबरी आहे.
नाईक निंबाळकर राजघराण्याची सुकन्या, भोसले घरण्याची स्नुषा, राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांची सून आणि भोसले घराण्याच्या तीन सुकन्या व एकमेव छावा छत्रपती संभाजीराजे यांच्या मातोश्री अशा विविध अंगाने अत्यंत प्रभावीपणे सईबाईंच्या व्यक्तित्वाचा आढावा घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.
समन्वयाची...स्वप्न आणि वास्तव यांच्या समन्वयाची दोन टोके जोडता येऊ शकतात असा आशावार या त्यांच्या लेखनात आहे
लेखक र. वा. दिघे लिखित सोनकी कादंबरी आहे. त्यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाशी संबंधित उल्लेखनीय कादंबरी लिहिली आहे.
या पुस्तकात आईनं मुलीला लिहिलेली आंतरिक जिव्हाळ्याची पत्रे हा अभिनव फॉर्म हाताळून स्त्रीवादाचे विविध पैलू समर्थपणे उलगडून दाखवले आहेत.
प्रा. मिलिंद जोशी लिखित पंधरा कथांचा संग्रह... ‘तमाच्या तळाशी’
शब्दांच्या माध्यमातून भेटलेली माणसं उलगडून दाखवण्याचा हा प्रयत्न.
कादंबरीमय वारकरी संतांचे त्याचप्रमाणे समृद्ध वारकरी परंपरेचे दर्शन घडविणारे पुस्तक.