गोधरा व नंतर झालेल्या हिंसेचे सत्य.‘Gujarat Riots : The True Story' या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद.
ह्या पुस्तकामुळे वंश, गोत्र, कुळनाव समजून घेणे खूपच सोयीचे झाले आहे सर्वसामान्यांबरोबरच अभ्यासकांनाही उपयुक्त ठरेल.
आकार हे आत्मगत निव्वळ एका दर्जेदार शिल्पकाराच्या उत्तमोत्तम कलाकृतींच्या जडणघडणीचे रहस्य उलगडून दाखविते एवढेच नव्हे तर ते अथपासून इतीपर्यंत अत्यंत वाचनीय ठरते.
वैद्यकीय क्षेत्रातील सत्य घटनांवर आधारित सामाजिक, हृदयस्पर्शी कथा.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरित्रावर आणि कार्यावर प्रकाश टाकणारा ग्रंथ
विविध वृत्तपत्रांच्या स्तंभातून प्रकाशित झालेल्या ललित लेखांचे हे पुस्तक.
ह्या संग्रहातील सोळाही कथा वेगवेगळ्या विषयांवरील आहेत आणि आपल्या नेहमीच्या अनुभवातून आणि विचारांतून त्या शब्दांकित झालेल्या आहेत
डॉ श्रीकांत गोडबोले यांच्या निवडक कथांचा संग्रह.
बहिणाबाई चौधरी लिखित "बहिणाबाईची गाणी" हा कवितासंग्रह आहे.
दुसरा कथासंग्रह. वर्हाडी, ग्रामीण, कोरकू आणि गवळी समाजाचे ह्रदयस्पर्शी चित्रण हे त्यांच्या कथांचे आशयसूत्र याही कथासंग्रहात कायम आहे
The Other Face Of Cancer या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद.कॅन्सरबाबत वाचकांच्या मनात असलेल्या जुन्या समजुतींना हे पुस्तक आव्हान देते.
मारुती चितमपल्ली लिखित ‘चैत्रपालवी’ हे पुस्तक आपल्याला पर्यावरणाचे दर्शन घडवतात.
‘नात्यांची वीण आपलं जगणं सुशोभित करते. ही वीण ज्यांना वेळीच करता येते, त्यांच्या आयुष्याची आनंदयात्रा सदैव गजबजलेलीच दिसते...’ असा प्रसन्न आशावाद व्यक्त करणारा, आनंदयात्रेतील क्षणांत गुंतवून ठेवणारा अनुभव या ललित लेखसंग्रहात पनोपानी फुलांसारखा बहरलेला आहे.
एक संवेदनशील मनाचा एकनाथ तट्टे हा कथाकार जेव्हा आपल्या भावभावनांची अभिव्यक्ती करतो तेव्हा त्यांच्या कथांचा आंतरिक गाभा मृद्गंधाने भारलेला असल्याची जाणीव वाचकांना होते.
गणित हा आता केवळ विषय न राहता त्याच्या अनेक उपशाखा निर्माण झाल्या आहेत.
पक्ष्यांची तपशिले, त्यांच्या वीणीची भातुकली मारूती चितमपल्ली यांनी निर्मितीच्या पातळीवर साकार केलीत.
इच्छामृत्यूवर आधारित एक उत्कंठावर्धक कादंबरी.
मायाळू धनेशाचे गुपित हे पुस्तक लेखकाने भारतीय राखी धनेश (इंडियन ग्रे हॉर्नबिल) या पक्ष्यावर सलग तीन वर्षे केलेल्या संशोधनाची सचित्र कथा आहे.
मारुती चितमपल्लींचे पर्यावरण व निसर्गावरील लेखन
हा लेखसंग्रह प्रसिद्ध व्हावा असे खूप दिवसापासून मनात होते त्याचे कारण असे की या लेखसंग्रहात समाविष्ट असलेल्या लेखांचा कालखंड गेल्या वीस-पंचवीस वर्षे इतका प्रदीर्घ असला तरी आजतागायत या लेखनाला समकालीन पर्यावरणाची किनार लाभलेली आहे.
शिरीष पै संपादित सुरेश भटांच्या कविता
मारुती चितमपल्लींचे पर्यावरण व निसर्गावरील लेखन
तरुण मुलींना मार्गदर्शन व समुपदेशन काळाची गरज.बदलत्या खराब सामाजिक वातावरणातही मुली कमळासारख्या निर्मलतेने तरारून वर आल्या पाहिजेत हा या पुस्तकाचा उद्देश.
विदर्भातील अग्रगण्य संशोधकांची व कार्याची महती सांगणारा हा ग्रंथ.
`येंजो’ ही मेळघाटातील चमोलीसारख्या आडवळेणी दुर्गम भागातील आदिवासी तुमला-हिरय यांच्या सांसारिक, सांस्कृतिक वाताहतीची वास्तवदर्शी कहाणी.