बैठकीच्या कहाण्य़ां मध्ये निरनिराळ्या देशांमधील प्रातिनिधिक व्यावसायिकांबरोबर झालेल्या बैठकांच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणच्या वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वास्तवाचे चित्रण केले आहे.
गप्पांना विषयाचं बंधन नसतं. अड्डा जमला की मजेशीर गोष्टींची चौफेर आतषबाजी होते. मनुष्यस्वभावाची गंमत म्हणजे जे मत काहीजणांना भावतं ते काहींना चावतं.
उन्मत्त रशियन मदनिका - कम - अंमलदार, सोविएत व्यापार विभागाचा लाघवी उपायुक्त, सौदर्याने मुसमुसलेली महत्वाकांक्षी सेक्रेटरी - कम - कॉलगर्ल, निराश टॅक्सी ड्रायव्हर पोटार्थी चाकरमानी आगतिक महिला, सोबिएत व्यापार प्राधिकरणाचा पदोन्मत्त जनरल डिरेक्टर, विलोभनीय सुखवस्तू गृहीणी...
अमेरिकेला जाणा-यांची संख्या फुगते आहे. जाणारे अधिक, पर येणारे कमी. परत न येण्याच्या उद्देशाने दोर कापून गेलेला सुपुत्र झटक्यात अमेरिकन संस्कृती आत्मसात करतो.