एका अर्थाने, हे राजकीय प्रचाराचं नाटक आहे, पण हे कमिशन्ड नाटक असलं तरी ते प्रचारनाट्य न करता विचारनाट्य होईल असाच माझा प्रयत्न होता.
कादंबरीत साठेंचा तृतीय पुरुषी निवेदक जे विदारक वास्तव रेखाटतो तो आपला चालू वर्तमानकाळ. आपलं समकालीन वाळवंट. ज्यात अनेक काळ बथ्थड गोळ्यांसारखे एकमेकांवर कर्कश्श्यपणे आदळत बधिरपणा आणतात.
मकरंद साठे लिखित "घर/वाढदिवस" हा नाटयसंग्रह आहे
मकरंद साठे यांच्या काळे रहस्य मधील सर्व महत्वाची पात्रे आपापली कल्पितकथा निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत.
कालावधीची बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिप्रेक्षातून मीमांसा करणारे लेखन क्वचितच आढळते. मकरंद साठे यांच्या या पुस्तकामुळे ही उणीव अंशत: भरुन येण्यास मदत होणार आहे.
समाजाविषयी आस्था असणारे समाजशात्रज्ञ, तत्त्वचिंतक, सर्जनशील कलावंत यांच्या याविषयीच्या निवडक चिंतनाचा आणि मुलाखतींचा हा संग्रह आहे.
नाट्यलेखनाविषयी सर्वात महत्वाची बाब ही जाणवते की सत्यशोधाचा सार्वकालिक विचार हा नाट्यमय पण अकृत्रिमपणे नाटकात उतरला आहे _ अनिल खुटवड
वारंवार कुरुक्षेत्री येताती मनुष्ये नीतिप्रश्नांची काखोटी मारोनी धनुष्ये तरीही उद्भवती प्रश्न तेच नाना प्रसंगी वारंवारिता असे पण अर्थ बदलती वेगवेगळ्या संदर्भी येती क्षण कसोटीचे अर्थ लागती वेगळे त्याच प्रश्नांचे