आहार शास्त्र आणि कलाविषयक मार्गदर्शन निश्चितच आपल्याला या पुस्तकातून मिळेल
या पुस्तकात आहार, योग आणि वैवाहिक जीवनाचा फक्त शास्त्रीय दॄष्टिकोनातून विचार केला आहे.
जरी ह्या पुस्तकात प्राधान्य आहारला दिले असले तरी सुध्दा योग, आसने, व्यायाम, अन्य उपचारालाही योग्य ते स्थान दिले आहे.
खुदी को कर बुलंद इतना की हर तक्दीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है॥
गोंदवलेकरमहाराजांनी प्रत्येक दिवसाच्या नामसाधनेसाठी केले मार्गदर्शन.
आमचं नाव बाबूराव विनोदी नाटक
प्रा रा. रं बोराडे यांच्या कादंबरीवर आधारित तीन अंकी नाटक
आपले’ से हा माझ्या आवडत्या व्यक्तींवरच्या लेखांचा संग्रह. Aapale Se is a collection of writers favourite persons. Aaplae Se is written by Anil Awachat.
आरोग्यविश्व या पुस्तकात अवकाशवैद्दक विषाणुवैद्दक यावर लेख आहेत.
मराठी साहित्यविश्वाचा संक्षिप्त आढावा.
चेखवच्या निवडक लघुकथांचा एक संग्रह.
आत्मकथा : भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याने मनापासून वाचावा असा देशप्रेम, कष्ट, आधुनिकता व मानवता यांचा विलोभनिय महान संगम म्हणजे पंडितजींची आत्मकथा. मूळ आत्मचरित्राचे अनुवादक श्री. ना.ग. गोरे यांच्या कुशल लेखणीतून केलेला संक्षेप...
आपलं अस्तित्व, त्याचे अनेक दॄष्य व अदॄष्य पैलू आणि मॄत्युउपरांत जीवनाचं स्वरुप.
पतीच्या मृत्युचे दुःख सहन करून आपल्या पुत्रासाठी खंबीरपणे उभी राहिली हा एकप्रकारे नियतीवर उत्तरेने मिळवलेला विजयच होता.
डॉ माधव नागरेंचे बागकामावरील पुस्तक
डॉ. संध्या बोडस-काणेंचे निसर्गावरील लेखन
हा ग्रंथ १९३८ च्या ऑक्टोबरमध्ये प्रथम प्रकाशित झाला. हा केवळ राजकीय इतिहासाचे निरुपण करणारा ग्रंथ नसून, सांस्कृतिक प्रश्नांची मूलगामी चर्चा करणारा असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विचारवंतांचे लक्ष त्याच्याकडे आकर्षिले गेले.
हिटलरच्या संमिश्र भावनांचं समर्थपणे चित्रण करणारी कादंबरी
हिटलर आणि दुसरे महायुद्ध ह्यांच्यामधील परस्परसंबंधांविषयीचा, अर्थात दुसर्या महायुद्धाच्या जनकत्वाविषयीचा, विपर्यास प्रस्तुत पुस्तकाद्वारे मोठ्या खोडून काढला आहे आणि नेमके सत्य काय आहे ते लेखक पराग वैद्य यांनी स्पष्टपणे मांडले आहे.
संदीप खरे लिखित "अग्गोबाई ढग्गोबाई" हा कवितासंग्रह आहे.
रक्तदाब म्हणजे काय? रक्तदाब कसा मोजतात, रक्तदाबाची कारणे, लक्षणे व परिणाम व रक्तदाबाविषयी सर्वसामान्य माहिती
अल्बर्ट आइन्स्टाईनच्या जीवनाचा घेतलेला आढावा.
ऐसी कळवळयाची जाती हा प्रा. मिलिदं जोशी यांनी रेखाटलेल्या सतरा व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. शब्दांतून प्रकटलेल्या या व्यक्तींचे सुरम्य दर्शन घेताना वाचकही माझेप्रमाणे या व्यक्तींशी आत्मीय संबंध जोडतील, एवढी ही व्यक्तीचित्रे वेधक झालेली आहेत. आपल्या आतल्या दृष्टीपुढे या व्यक्ती साक्षात उभ्या राहतात. झाडांना नवी पालवी फुटते, तसे शब्दांना डोळे फुटतात.
इतिहास म्हणजे फक्त राजकीय नसतो. मानवी जीवनाच्या सर्व पैलूंचा त्यात समावेश असतो. श्रध्दा फक्त धार्मिक नसतात, तर समाजाच्या जीवनविषयक श्रध्दा, अभियांत्रिकी, वैज्ञानिक संकल्पना त्याने उभरलेल्या निर्मितीतून कळतात. त्याही अभ्यासण्याची आवश्यकता असते.
देहाचिये गुंती’ नंतर अंजली सोमण यांची एका वेगळ्या विषयावरील कादंबरी!
मी म्हणजे या बाबतीत वर्षभरासाठीचं तिकीट काढलेला प्रवासी आहे.
1857 सालची ‘दंगल’ हे पहिले स्वातंत्र युद्ध होते की नव्हते याबद्दल उलटसुलट, भरपूर चर्चा झालेल्या आहेत. युद्ध म्हटले की, त्यासाठी आवश्यक असणारी सूत्रबद्ध आखणी, कल्पक योजकता, शिस्तबद्ध व्यस्थापण असावे लागते.
आक्षिप्त मराठी साहित्य हे पुस्तक डॉ. गीतांजली घाटे यांनी परिश्रमपूर्वक केलेल्या संशोधनाचे आणि अभ्यासाचे फलित आहे.
ग्रीक लोकांमध्ये स्वतंत्र लोक व गुलाम लोक असे दोन प्रकार असत. सॉक्रेटिससारख्या विचारवंत लोकांसही वाटे की काही लोकांस ईश्वरानेच निर्मान केले
काम, क्रोध, व्देष, क्षुधा, खून, आत्मनाश यांनी अकस्मात पेटून निघणारी व तितक्याच आकस्मिकपणे विझून जाणारी माणसे जी. ए. यांच्या कथेत पुन:पुन्हा दिसतात.” - डॉ. द. भि. कुळकर्णी
रमा पर्वतीकरांचा हा कथा संग्रह म्हणजे अनुभवलेल्या घटनांची मांडणी आहे. नात्यातले किंवा मैत्रीतले चार जण एकत्र जमल्यावर, अनुभवलेले प्रसंग सहजतेने सांगत जातात, तसे हे सहज कथन आहे. कथांमधील संकटांची मालिका असली तरी पटापट प्रश्न सोडवत, उत्तरे शोधत सार्या कथा पुढे नेल्याने वाचक कथा वाचनाची रंगत घेऊ शकतात.
आनंद शून्य कि. मी होलिस्टिक हायवे वरुन .... ललित लेखसंग्रह
हेरगिरीच्या विश्वातील श्रीनिवासच्या बुद्धीचातुर्यांने नटलेल्या हेरकथा
या कथेचा प्रत्यय या कथासंग्रहाने पुन्हा एकवार येईल. हा संग्रह मराठी कथालेखनाचे दालन निःसंशय समॄद्ध करील.
या पुस्तकाद्वारे लेखिकेने आपले हाल होऊ नयेत व आपण आजारी पडू नये यासाठी हा सारा शब्दप्रपंच मांडला आहे.
आर्थिक संकल्पनांचा अर्थ आणि आशय. जिज्ञासापूर्तीचे अवघड काम अत्यंत सुबोध भाषेत करणारे पुस्तक म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल.
अरविंद गोखले कथाविश्व
अरविंद गोखले यांची कथा निवडक कथांचा प्रातिनिधिक संग्रह.
अनावृत आकाशाखाली अनावृत मनांनी भेटणारी सरळधोप माणसं आपली वाटतात. हवीहवीशी वाटतात. मी बेतलेली ही मने व चितारलेले हे नमुने हवेहवेसे वाटणारे नक्कीच आहेत.
उदय जोशी यांची ‘अस्तपर्व’ ही कादंबरी केवळ इतिहास सांगत नाही तर इतिहासाचे संस्कार करते. इतिहास म्हणजे केवळ गतकाळ, व्यक्ती किंवा घटना यांची माहिती देणं नव्हे, तर इतिहास हा माणसाच्या जीवनावर घडणारा संस्कार आहे.
महाभारताचा एक युगपुरुष अमर,अजरामर अश्वत्थामा आजही भूलोकी त्याचा अस्वस्थ आत्मा घेऊन चौफेर हिंडत आहे त्या अस्वस्थ आत्म्याची जीवन कहाणी...
प्रसिध्द अभिनेत्री स्मिता जयकर लिखित हे पुस्तक.
स्वातंत्र्यानंतर आणि आत्ताच्या काळातल्या पिढीला पंडित नेहरू माहिती असले तरी त्यांच्याविषयी, भारतातल्या तत्कालीन राजकारण, समाजकारण यांविषयी सखोल माहिती असेलच असे नाही.त्या दृष्टीने नेहरूंची ही आत्मकथा उपयुक्त ठरते.
औषधाविना आरोग्य "प्रज्ञा शोध" अत्यंत उपयुक्त अनमोल मार्गदर्शक पुस्तक.
औषधी वनस्पती एक आढावा, औषधी वनस्पतींची शेती-एक दृष्टीकोन, औषधी वनस्पती-आर्थिकदृष्या फायदा आणि इतरही बरेच काही या पुस्तकात आहे.
शरदबाबूंचे जीवनचरित्र ‘आवारा मसीहा’ चा शरदिनी मोहिते यांनी तन्मयतेने केलेला हा अनुवाद नव्या पिढीतही शरद-प्रेम निर्माण करेल.
अंजली धडफळे - यांचे बैठं काम सुंदर व्यायाम
बलशाली स्वराज्याचे स्वप्न पाहणा-या या कर्तबगार ’थोरल्या पेशव्या’चे पारिवारिक व राजकीय तपशीलांसह मराठीतील पहिले सर्वसमावेशक विस्तृत चरित्र.
प्रबोधनकार ठाकरे यांचा थोडक्यात जीवनपट प्रबोधनकारांनी बाळ ठाकरे यांच्यावर केलेले संस्कार.
१८५९ च्या बंडामागच्या प्रेरणा, उठाव आणि याला मानवी जोड असलेली "बंड" ही ऐतिहासिक कादंबरी.
बारोमास ही एक महान शोकांतिका आहे. उत्क्ट होत जाणारा नाटकाचा शोकानुभव ही कादंबरी देते. या कादंबरीला २००४ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. (Baromas is Awarded by Sahitya Akademi Award in 2004)
बेर्टोल्ट ब्रेष्ट मराठीत चार नाटके भाषांतर विद्याधर महाजन
"भैरप्पा साहित्य : मराठी समीक्षा" कन्नडमध्ये लेखन करणा-या या भारतीय लेखकाचा अधिक परिचय..
पंडित जवाहरलाल नेहरु लिखित ‘भारताचा शोध’ अनुवादक साने गुरुजी / ना. वि करंदीकर.
भारत देशाला शिल्पांतील मूर्तिकला आणि मूर्तीमधील सौंदर्य काही नवीन नाही. मुळांतच भारतीयांमध्ये हा कलागुण असल्याने अनेक देवदेवतांच्या मंदिरांमध्ये, अगदी पूर्वी निर्जन असणार्या गुहांमध्ये हे वैशिष्ट्य सहसा दिसून येते. हे कलावैशिष्ट्य, हे मूर्तिसौंदर्य पाहून आपण आश्चर्याने थक्क होतो
विद्यार्थी आणि वाचक यांना हे पुस्तक वाचनीय आणि संग्रही ठेवावे असे आहे.
भारतीय परंपरा आणि कबीर यांचे विवेचन.
एका सामान्य माणसाने सामान्य जनांकरिता लिहिलेले हे पुस्तक आहे.
ए.जे.एयर यांचे भाषेवरील लेखन
आपल्या प्रभावी लेखनाद्वारे राष्ट्रधर्म व स्वाभिमान जागृत करणारे देशोन्नोतीसाठी लेखणी हातात घेऊन इंग्रजांशी लढा देणारे मराठी भाषेतील शिवाजी यांचे कथारूपी चरित्र.
प्रतिमा दुरूगकर यांचे पर्यटनविषयक लेख 2000 सालापासून विविध साप्ताहिक आणि नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत आहेत.
मराठीतील सर्वश्रेष्ठ बखर. पनिपतच्या युद्धावर आधारित पेशवेकालीन भाषेचा उत्तम नमुना अभ्यासायला मिळतो.
भुईरिंगणी हे श्री.सदानंद देशमुख याचे ललितगद्य आहे.
१९५०च्या आसपास युरोपात आलेल्या युद्धोत्तर भोगवादी,चंगळवादी जीवनाचे मोहक पण तितकेच धोकादायक चित्रण कादंबरी करते.आजचा मराठी वाचकवर्ग सांस्कॄतिक दृष्ट्या या कादंबरीच्या मानसिकतेशी मिळता जुळता आहे.
वामनवृक्षकलेविषयी सर्व काही.
डॉ. सिंधू डांगेंचे बौद्धधर्मावरील लेखन
भारताचा प्राचीन इतिहास उज्ज्वल आहे. भारतीय इतिहासाची पाने चाळून पाहता भारतीय संस्कृतीची पाळेमुळे किती खोलवर पसरली आहेत याचा मागोवा घेतां येतॊ.
लेखक अनिल दामले यांनी आपल्या मित्रमंडळींसोबत दक्षिण आफ्रिकेतील दक्षिण टोक केप टाऊन व इजिप् तमधील कैरो हा अतिशय खडतर प्रवास त्यांनी गाडीने केला त्याचे चित्तथरारक आणि मनोरंजक अनुभव आपल्यापुरतेच मर्यादित न ठेवता मराठी वाचकांसाठी पुस्तकरूपाने सादर केले आहेत.
महाभारतात जेवढा स्वच्छ प्रकाश आहे, तितकाच दाट अंधार आहे.त्या अंधारात जी अनेक गूढे आहेत, त्यापैकी तर हे नाही ना! माझ्यापरीने मला एक वाट दिसली.ती मी धरली. ही एकांकिका त्या वाटेवरची.
चक्रवर्ती ही माझी ऐतिहासिक व्यक्तीवर आधारलेली दुसरी कादंबरी. कादंबरी म्हणजे इतिहास नव्हे आणि ललित लेखक म्हणजे इतिहासकार नाही.