गुंतवून ठेवणारी, अस्वस्थ आणि अंतर्मुख करणारी कादंबरी. वसंताच्या प्रेमात वेडी झालेली कविहृद्याची राणी, दिघ्यांच्या घराचा उंबरा ओलांडते खरी पण लग्नांतर काही दिवसांतच तिला प्रीती सुकून गेल्यासारखी वाटते. आपल्या जीवनात वसंत फुलवणारा तिला वैशाखवणव्यासारखा भासू लागतो. चेटूक झाल्यागत ती उदात्त प्रीतीचा शोध घेऊ लागते आणि सुरुवात होते संघर्षाची ही कहाणी.
ही आहे एक धमाल कहाणी. ती घडते देवनगरीत म्हणजे तुमच्या आमच्या सभोवती. आपण डोळे उघडून बघायला मात्र हवं. देव, धर्म, संस्कृती अन् परंपरेच्या व्यापारीकरणात हदयातला ईश्वर हदयातला ईश्वर हदयातच हरवतो.
स्त्रीला नेमकं हवं तरी काय? ह्या प्रश्नाचा वेध घेणारी विश्राम गुप्ते यांची लहानखुरी कलाकृती....
परीकथा आणि वास्तव साहित्य, जीवन आणि संस्कॄतीचं पुनर्वाचन.