श्रीनिवास गडकरी लिखित हे पुस्तक रायगड जिल्ह्यातील ‘इतिहास जपणारी गावं’
निठवं... बाजलं... इरलं... सलदं... मुदाळं... जावई खिडकी... ही कसली नावं ?
मी सतत नवीन काही जगावेगळं शोधत राहिलो. काहीतरी समाजोपयोगी, दिशादर्शक, कलात्मक, धाडसी गोष्टींचा शोध घेतला. अर्थात ही शोधयात्रा मलाच घडवत गेली. कारण जगावेगळ्या गोष्टींचं व व्यक्तींचं एक वेगळंच जग माझ्यासमोर उभं रहिलं.