ही कहाणी आहे, १७५ दिवसांची. कालखंड तसा लहान परंतु परिणामांच्या दृष्टीने निर्णायक. अटली यांनी २० फेब्रुवारीला केलेली घोषणा हा या कहाणीचा प्रारंभबिंदू.
ज्ञानपीठ पुरस्कार-प्राप्त डॉ. गुरुदयाळ सिंह म्हणजे पंजाबी भाषा-साहित्यातील लक्षणीय मानदंड. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, बालवाड़्मय आणि अनुवाद असे सर्व साहित्यप्रकार त्यांनी सहजपणे हाताळले आहेत. त्यांच्या कथासाहित्याचा विचार करू जाता काही गोष्टी ठळकपणे समोर येतात.
काही चित्रपट असे असतात की ते एकदा पाहिल्यानंतर आयुष्यभर आपली सोबत करतात. अस्तित्त्वाच्या खोल तळाशी एक झरा बनून ते झुळझुळत राहतात. अशा काही प्रसन्न चित्रपटांच्या - अक्षय आनंदाच्या झर्यांच्या - या कहाण्या - अनोख्या पाडळकरी शैलीत.
योगशास्त्र हे केवळ समजण्याचे नसून प्रत्यक्ष करुन अनुभवण्याचे आहे. तरीही ते काय आहे हे समजणे हिताचेच आहे. संस्कृत भाषा शिकावी लागते.
अनारोग्याच्या विळख्यात अडकलेया गरीब, बालक किंवा युवा यांची तर मला फारच काळजी वाटते कारण त्याचे उपाय करता करता गरिबांचे पैसे, बालकांची अल्पशक्ती आणि युवकांच्या आयुष्यातला मोलाचा काळ वाया जातो.
हे पुस्तक वाचून बर्याच जणांना आपल्या व्यक्तिमत्वात सौंदर्याची भर घालता येईल अशी लेखिकेला खात्री आहे.
स्वातंत्र्यलढ्यात एकट्या-दुकट्या इंग्रजाचे रक्त सांडण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न चापेकरांनी केला. यासाठी सर्व बंधुंचे बलिदान होणारे हे एकमेव उदाहरण होय. त्या ‘चापेकर-पर्वा’ची ही रोमहर्षक कहाणी...!
‘लघुतम कथा’ हा साहित्यप्रकार मराठीत बराच दुर्लक्षित आहे.हे पुस्तक म्हणजे २९ लघुतम कथंचा संग्रह.
१९७१च्या युद्धात सहभागी झालेल्या भारतीय फायटर पायलट्सचे अनुभव.
पुरूषप्रधान समाजानं स्त्रियांना शतकानुशतकं पुष्कळ सोसायला लावलं आहे, हे खरंच
आधुनिक जगात प्रत्येक गोष्ट विज्ञानावार आधारित असल्याशिवाय तिचा खरेपणा सिध्द होत नाही तरीही जगात अशा काही घटना घडत असतात की त्या विज्ञानाच्याही पलीकडे असतात
विजय पाडळकर लिखित तीन जपानी महाकवींचे जीवन आणि कार्य यांची माहिती करुन देणारा नाविन्यपूर्ण ग्रंथ
विसाव्या शतकाने अनुभवलेल्या या विनाशक वादळाची ही चरितकहाणी. हिटलर वरील अभ्यासपुर्ण पुस्तक..!
पश्चिम आशियाची संतत्प मरूभूमी म्हणजे जणू, रक्तमय समरप्रसंगांसाठी नियतीने उभारलेला विराट रंगमंच.
त्या नदीच्या, अरण्याच्या, पर्वत्राजीच्या पलीकडे आपल्याला पोहोचायचे आहे. भारतमाता आपल्याला हाक देत आहे,
वामन काळे - आकाशवाणीवर वरिष्ठ निवेदक (Selection Grade Announcer) म्हणून नोकरी. गाव - वाडा, तालुका - देवगड, जिल्हा - सिंधुदुर्ग. नोकरीनिमित्त बरेच वास्तव्य सांगलीत.
ज्यांच्या मनातील भय-विस्मयाचे आकर्षण अद्याप लोपलेले नाही, अश्यांना ही कादंबरी धक्का देऊन जाईल, हे नि:संशय.
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एका रोमांचक अध्यायाची तोजोगर्भ चरितकहाणी.
कवितेची रूपे कितीतरी असतात. त्यांचा आस्वाद अनेक पातळ्यांवर घेताना आपण वर-खाली होतो. अनेक क्षेत्रांमधले संदर्भ उचलून आणतो. काही वेळा आपल्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनातून, तर काही वेळा आपल्या वाङ्मयीन परंपरेतून हे संदर्भ येतात. कधी लोकपरंपरेतून रूपसिद्धी होते, तर कधी आदिबंधाच्या प्रकाशात तिला न्याहाळता येते. या स्फूट लेखन त्या घडण्याच्या प्रक्रियेचेच निवेदन...
आपण वाचतो, ऎकतो त्या कविता किंवा ती गाणी सगळीच काही आपल्याबरोबर वाढत नाहीत. काही भेटतात तेव्हा इतकी आवडतात, हलवतात की त्यांना वयाचा तो अख्खा टप्पाच बहाल असतो. पण मग नंतर त्यांचा कॆफ हळूहळू उतरत जातो. आपलं वय आणि समजूत थोडी थोडी वाढत जाते तेव्हा कधी त्या मागे राहिलेल्या कवितांविषयी थोडी हुरहूर वाटते
साहित्यविश्वात अलिकडे बोकाळलेल्या अपप्रवृत्तींची ही अफलातून व्यंगचित्रं. एका संवेदनशील चित्रकाराने रेखाटलेली; पण कुंचल्यातून नव्हे तर लेखणीतून उतरलेली.
‘मनांतरी’ हा प्रख्यात मानसोपचार तज्ञ डॉ.नंदू मुलमुले यांचा मनाशी निगडीत ललित लेखांचा हा संग्रह.
सहा दीर्घ कथा असलेला संतोष शिंत्रे यांचा हा कथा संग्रह. लेखकाला ललकारणारे, अस्वस्थ करणारे, काही वेळा सुखावून जाणारे आणि काही वेळा विषण्ण करू शकणारेही विषय तर सभोवताली असतातच. त्याला कथाचे मूर्त स्वरूप येण्यासाठी वाट पहावी लागते. सारी घटिते, सत्ये, कल्पिते या सर्वांना सर्जनाच्या एका समान सूत्रात बांधणी कथाकारासाठी आवश्यक असते. असा हा कथासंग्रह वाचकांसाठी...
12 new mudras including kubera and prajna mudras.
पाहू आनंदे हा संक्षिप्त स्वरूपातील डोळयांचा ज्ञानकोष म्हणता येईल. चराचर सृष्टीच्या आनंदाची अनुभूती देणा-या आपल्या या डोळयांचे कार्य कसे असते?
‘पराजित-अपराजित’ हा वि. स. वाळिंबे यांचा ग्रंथ म्हणजे एक राजकीय ‘रोमान्स’ आहे. - प्रभाकर पाध्यॆ
राजकीय पार्श्र्वभूमी लाभलेली एक विलक्षण उत्कंठापूर्ण व रोमांचक कादंबरी.
ख्यातनाम लेखिकांच्या स्त्री-विषयक सकस कथांचा सरस भावानुवाद.
जगावेगळ्या कथाकाराच्या आरशासारख्या स्वच्छ लेखणीतून साकार झालेल्या,‘बगैर उनवान’ ह्या एकमेव कादंबरीचा सरस अनुवाद.
अमृता प्रीतम या पंजाबी व हिंदी भाषेत लिहिणा-या श्रेष्ठ लेखिका होत्या. सहा दशकांच्या दीर्घ लेखन कारकीर्दीत त्यांनी शंभरहून अधिक पुस्तके लिहिली. त्यामध्ये कविता, कादंबरी, चरित्र, कथा आणि निबंध हे वाड्.मयप्रकार समर्थपणे हाताळले.
सहजता संवाद व साक्षेप म्हणजे निकोप आधुनिक जीवनशॆली. ‘सहजरंग’ हे अशा शॆलीचा नमुना होय. - रा. ग. जाधव
कोल्हापूर जिल्हयातील हरळी या खेडयातून मुजुमदार नामक एक तरूण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये रूजू होउन उत्कृष्ट शिक्षक म्हणून लौकिकास पात्र होतो,
१९६५ मध्ये पाकिस्तानाबरोबर झालेल्या बावीस दिवसांच्या युद्धाची ही महान कहाणी.
थोर लेखक-संपादक कॆ.वि.स.वाळिंबे यांच्या सुविद्य पत्नी विनिता वाळिंबे यांचे हे छोटेखानी आत्मकथन. बार्शीची इंदू दिगंबर केसकर पुण्याची विनिता विनायक वाळिंबे झाली
प्रत्येक भारतीयाला वेदमंत्रांहुनही अधिक वंदनीय वाटणारा सहा अक्षरी मंत्र. या मंत्राने आपल्या माथ्यावर मिरविला ज्ञात - अज्ञात हुतात्म्यांच्या अलौकिक कर्तृतवाचा रक्ततिलक.
सच्चिदानन्द शेवडे यांनी ऐन गरजेच्या वेळी वृत्तपत्रीय लिखाणाला हात घातला आहे. कारण हल्लीच्या माध्यमात अतिशहाण्या अर्धवट संपादकांचा भरणा खूप झाला आहे.
अरुणा ढेरे यांच्या एकूण ललित लेखनात त्यांच्या विकसित होत गेलेल्या व्यक्तित्वाच्या आणि सृजनशीलतेच्या अनेक खुणा दिसतात.
जमीन, नदी, जंगलं, पर्वत, पशु-पक्षी यासह सगळ्या नैसर्गिक भवतालात मिसळून गेलेलं प्राचीन लोकसमूहांचं आयुष्य आणि त्यांच्या आधारेच पिढ्यान्पिढ्या जगत राहण्याची त्यांची इच्छा या सगळ्याच कथांमधून डोकावताना दिसते.
स्त्रीजीवनाच्या संदर्भात सांस्कृतिक पॆस धांडोळण्याचा हा एक मुक्त प्रयत्न आहे.
ऐकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध असा जवळजवळ एक शतकाचा कालखंड हा स्त्रीसुधारणा आणि स्त्रीसंघटन या दोन्ही दृष्टींनी फार महत्वाचा आहे.
स्त्री संवेद्द् या शीर्षकातून सुचविल्याप्रमाणे हा संग्रह स्त्रीमनाचे संवेदन जाणून घेण्याच्या मध्यवर्ती सूत्राभोवती गुंफलेला आहे. स्त्रीच्या साहसी मोहिमा आतल्या आणि बाहेरच्या दोन्ही जगांना सांधण्यासाठी जणू धडपडत असतात. त्यात कधी संघर्षही असतो. या तिच्या संवेदनविश्वाची ओळख आजच्या स्त्रीला तिची विकासाची आंतरिक क्षमता, सर्जनशीलता आणि प्रतिकारशक्ती लक्षात...
विज्ञानातील संशोधन फुटबॉल आणि भारतीय स्त्रीच्या क्षमतेची सांगड घालणारी एका वेगळ्याच विषयावरील ही कादंबरी वाचकांना निश्चित आवडेल.
मातृभूमीपासून दूर जाताना या स्वातंत्र्यवीराने तिला अभिवचन दिले: ‘ सारथी जिचा अभिमानी, कृष्णजी अणी राम सेनानी । अशी तीस कोटि तव सेना । ती अम्हाविना थांबेना । परि करुनि दुष्टदलदलना । रोविलच स्वकरी स्वातंत्र्याचा हिमालयावरि झेंडा जरतारी ॥’ त्या अदम्य आत्मविश्र्वासाची ही तेजोगर्भ चरितकहाणी.
पाडळकरांची तरल संवेदनशीलता, भावनांची काव्यात्मता नेमकेपणाने टिपणारी शब्दसंपदा, भावस्पंदनांच्या इंद्रधनुष्याचे रंग आणि आकार शोधण्याच्या प्रयत्नातील विकासाची पाउलवाट म्हणून या कथा मराठी कथेचे लक्षणीय अलंकार ठराव्यात. ’ _ डॉ. प्रकाश मेदककर
ही कथा व त्याचबरोबर इतर पाच कथा म्हणजे आधुनिक गूढ कथांचा संग्रह होय. या कथा रक्त गोठविणार्या तुटलेपणाची भावना निर्माण करणार्या आहेत. मानवाच्या निसर्गावर मात केल्याच्या पोकळ बढाईचाही पर्दाफाश करणार्या आहेत.
या रहस्यमय कथांमध्ये असंभाव्यता, प्राणघातक स्वप्नं आणि अर्धवट विसरलेली विश्वं दाखवली आहेत.
पॅरिस स्टॅलिनग्राड आणि बर्लिन दुसर्या महायुध्दातील तीन अत्यंत महत्त्वपूर्ण रणक्षेत्रे.
नामवंतांच्या आयुष्यातले लहानसे प्रसंग - घटना असं या लेखनाचं स्वरूप आहे. देश - विदेश, भाषा, धर्म, स्त्री - पुरूष, वर्ण - वंश या सगळया भेदांच्या पलीकडे जाणारे हे प्रसंग आहेत. काही अगदी
प्रिय वाळिंबे तुमच्या पुस्तकांना ’वाचनीय’ हे विशेषण मी जाणूनबुजून लावीत आहे. - पु.ल.देशपांडे
१९०५ ... हे वर्ष बंगालच्या फाळणीचे. त्याचप्रमाणे वन्दे मातरम् या शब्दांच्या मंत्रत्वप्राप्तीचे. या फाळणीमुळे भारतीयांमध्ये एकजुटीची भावना निर्माण झाली. एकीचे बळ शत्रूला नमविते याची जाणीव झाली. आणि मग... एक चॆतन्यमय लहर निर्माण झाली.
"ज्या भूमीचे पोटी आपण जन्म घेतला, तिच्याच पोटी ही सर्व लेकरे झाली. त्यांनी अन्नान्न करीत उपाशी मरावे, आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरीत रहावे, हे मला पाहवले नाही आणि म्हणून ब्रिटिश सरकारविरुध्द मी बंड पुकारले!"
मी सतत नवीन काही जगावेगळं शोधत राहिलो. काहीतरी समाजोपयोगी, दिशादर्शक, कलात्मक, धाडसी गोष्टींचा शोध घेतला. अर्थात ही शोधयात्रा मलाच घडवत गेली. कारण जगावेगळ्या गोष्टींचं व व्यक्तींचं एक वेगळंच जग माझ्यासमोर उभं रहिलं.
लेनिनने घडवून आणलेल्या क्रांतीची ही चरितकहाणी.
एक अद्भुत जगाची अद्भुत सफर - जी संपली तरी संपूच नये असे तुम्हाला वाटत राहील... म्हणून ही सफर आम्हीही सुरु ठेवणार आहोत.
लेखकाने OZ या भूमीच्या संदर्भात लिहीलेल्या कहाण्या इतक्या लोकप्रिय झाल्या की, जगभराच्या महत्त्वाच्या भाषांत त्यांचा अनुवाद झाला आहे.