हमीद दलवाई यांच्याकडे असणारी प्रतिभा, प्रभावी नेतृत्व, धर्मवाद्यांना हादरवून सोडण्याची धमक किंवा वादळी व्यक्तिमत्त्व नंतरच्या कार्यकर्त्यांत नसली तरी प्रामाणिकपणे यथाशक्ती कार्य पुढे चालवण्याची जिद्द मात्र आहे. हमीद दलवाई यांनी दिलेली वैचारिक शिदोरी आजही सोबत ठेवून मंडळाने चार दशकांकडे वाटचाल केली आहे, ही बाब निश्चितच अभिनंदनीय आहे.