एका परक्या शहरी स्त्रीला खेडं कसं आस्थापूर्वक सहानुभावाने सामावून घेते, याची वेधक गोष्ट या ठिकाणी वाचावयास मिळते. एक वेगळा प्रयोग म्हणून हे लेखन लेखकाला महत्त्वाचे वाटते. येथे केवळ वृत्तांकन नाही तर शोधातील सरमिसळ आहे. कोण कोणाला शोधतंय या घालमेलीत हे लेखन टाकते.