ही सर्व ठिकाणे अत्यंत देखणी आहेत.आगळीवेगळी आहेत. या प्रत्येकाला काहीना काही इतिहास आहे.
भारताच्या पूर्व किनार्यावर वसलेल्या ओडिशा राज्यातील कोणार्कचे सूर्यमंदिर हे खरोखरच एक अदभुत शिल्पलेणे आहे.
अव्याहत प्रवाहित होत असलेल्या या लोकमाता आपल्या प्रवाहात आजूबाजूचा प्रदेश सुजलाम सुफलाम करत आलेल्या आहेत. या नद्यांच्या काठी वस्ती वसली, संस्कृती बहरली. त्या संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही आपल्याला या नद्यांच्या खोर्यात पहायला मिळतात.
भारताच्या आग्नेयेला असलेला कंबोडिया हा छोटासा देश. हजारो वर्षापूर्वी भारतीय संस्कृती तिथे रुजली, नांदली, वृद्धिंगत झाली. तिथे असलेल्या ख्मेर राजवटीतील सम्राटांनी आपली भारतीय संस्कृती स्वीकारली. आजही कंबोडियात त्या संस्कृतीचे दर्शन आपल्याला तिथे उभ्या असलेल्या मंदिरांच्या रुपाने होत असते.
निसर्गाची अद्भुत किमया तसेच अनेक आश्चर्यकारक गोष्टी आपल्या आजूबाजूला मोठ्या संख्येने आहेत.या अशाच वेगवेगळ्या ठिकाणांचा केलेला हा प्रवास.
भारताच्या पूर्व किनार्यावर बंगालच्या उपसागरात पाय सोडून निवांतपणे बसलेला प्रदेश म्हणजे ओडिशा.
चालुक्य आणि विजयनगर ही दक्षिण भारतातील अत्यंत बलाढ्य राजघराणी.