स्वामींनी आपल्या वाणीतुन व ग्रंथातुन अर्वाचीन भौतिक शास्त्रांच्या प्रकाशात भारतीय संस्कॄतीच्या सिध्दान्तांचे श्रेष्ठ्त्त्व सर्व जगाला पटवून दिले आहे. सध्याच्या जीवनकलहात आपण कसे वागावे, याचे फारच मार्मिक विवेचन त्यांनी आपल्या ग्रंथातुन केले आहे. ज्यांना उत्त्म वकृत्व गाजवायचे असेल त्यांनी सुध्दा स्वामींचे ग्रंथ पुनःपुन्हा वाचावेत.