महाभारतात गीतेचा समावेश झाला तेव्हाइतकी आजही ती प्रत्यक्ष अनुभवाने नाविन्यपुर्ण व स्फूर्तिदायक ठरते. गीतेच्या शिकवणीचा प्रभाव हा केवळ तात्विक किंवा विद्व्दच्चर्चेचा विषय नसुन,आचारविचारांच्या क्षेत्रात जिवंत आणि लगेच जाणवणारा आहे.गीतेची शिकवण एका राष्ट्राचे आणि संस्कृतीचे पुनरुज्जीव्न प्रत्यक्ष घड्वीत आहे.जगातील श्रेष्ठ ग्रंथात गीतेचा एकमताने समावेश झाला आहे.