मूर्तिचा अभ्यास म्हणजे मूर्ती कोणत्या प्रकारच्या पाषाणात किंवा पाषाणापासून निर्माण केली आहे?ती कोणत्या कालखंडाशी संबंधित आहे? कोणत्या धर्माशी वा पंथाशी संबंधित आहे? स्वतंत्र आहे की मंदिरावर आहे? केवळ या प्रश्नांची उत्तरे देणे नाही. ती द्विभुज आहे की बहुभुज, एक मुख आहे की बहुमुख याची उत्तरे देणे नाही.या सर्व प्रश्नांची उत्तरे ही मूर्तिचे स्वरुप स्पष्ट करतात