गदिमा, पुलं आणि बाबुजी आज देहरुपाने आपल्यात नाहीत, पण आपल्या अलौकिक प्रतिभेनं त्यांनी निर्मिलेली ती शब्द-भाव-सुरांची दुनिया मात्र आजही तितकीच ताजी आहे. ही किमया करणारे दिग्गज कोणत्या मातीने घडलेले होते, कोणत्या नदीच्या पाण्यावर त्यांचा पिंड पोसला होता आणि कोणत्या गावाची हवा त्यांनी आपल्या फुप्फुसात भरुन घेतली होती हे आजच्या पिढीला कळावे म्हणून हा पुस्तक...