प्रगतीचा, आर्थिक सत्तेचा, ज्ञानवर्धनाचा, साहित्य, संगीताचा यशस्वी लंबक आपल्याच बाजूनं कसा राहील याची काळजी घेणारा वर्ग राजकारणाचा दोर आणि सत्तासोपानाचे पाय आपल्या हाती ठेवण्यासाठी पडद्याआडून फासे टाकत असतो. तर दुसरा वर्ग लोकसंख्येतील आपला मोठा आकडा पुढं करुन सत्तेत सत्ता नावाच्या घोड्याच्या लगाम सतत आपल्या हाती राहावा याकरिताच वारंवार उद्योग करीत राहतो.
पत्रकारितेच्या क्षेत्रात जवळजवळ अडतीस वर्षे गेली. हा काळ गोड, कडवट अनुभवांचा काळ. समाजजीवनात एक पत्रकार म्हणून वावरत असताना अनेकांशी संबंध आला, भेटलेली माणसं सगळीच वाचता आली नाहीत, समाजातील व अशा व्यक्तींमधील अंतराचा शोध घेतला.
पत्रकारितेत प्रवेश करणा-या अनेकांना त्यातील ग्लॅमरने भुलवलेले असते, परंतु या ग्लॅमरबाबत जे कष्ट, मर्यादा आणि नियमपालन करावे लागते त्याची जाणीव फार कमी लोकांना असते,
महावीर जोंधळे यांचा "पावसाचे पाय" हा कविता संग्रह आहे.
महावीर जोंधळे यांचा "तुतीच्या पानासाठी" हा बालकवितासंग्रह आहे.
शब्दांच्या माध्यमातून भेटलेली माणसं उलगडून दाखवण्याचा हा प्रयत्न.