अडथळे आले म्हणून थांबलं पाहिजे असं नाही. धावताधावता समोर भिंत आली तरी थांबू नका. ती ओलांडायची कशी, तिच्यातून पलीकडे कसं जायचं, तिच्याखालून मार्ग काढता येईल का, तिला प्रदक्षिणा घालून बाहेर जाता येईल का, याचा विचार करा. काहीही होवो, धीर धरा आणि पुढे जात रहा.
विकास हा दु:खदायक, त्रासदायक आणि अतिशय गैरसोयीचा असतो. नवीन आव्हानं आणि प्रतिष्ठा मिळवण्याच्या दृष्टीने आपण जेव्हा आटोकाट प्रयत्न करण्यासाठी स्व्त:ला सिद्ध करतो, तेव्हाच विकास घडून येतो.
रसरशीत गोष्टी. पोषक गोष्टी. घास भरवणार्या गोष्टी. प्रत्यक्ष न शिकवता अप्रत्यक्षपणे शिकवणार्या गोष्टी. काहीही उघड न करता सारं काही दर्शवणार्या गोष्टी. काहीही न बोलता कुजबुजणार्या गोष्टी.
तुला वाटतं तितका तू घायाळ नाहीस. तुला थोड्याफार वाईट आठवणी आहेत. हरकत नाही. कुठलंही महान व्यक्तिमत्त्व यातून सुटलेलं नाही. भीतीचा सामना कराल, तर ती निघून जाईल. भीतीला टाळू पाहाल, तर ती वाढत राहील.
माझ्या क्षमतांचा पुरेपूर वापर करण्यापासून मला थांबवणारी प्रत्येक गोष्ट एखाद्या साखळदंडासारखी आहे. हा साखळदंड मला तोडायलाच हवा. ‘चले चलो १’ वाचत असताना हे साखळदंड तुटून पडतील, असा आम्हाला विश्वास आहे.
जीवनात उत्तम गोष्टी प्राप्त करायच्या असतील, तर मी नक्कीच घडवून आणेन या ठिणगीने सुरुवात केली पाहिजे. आपल्याकडे कशाचीतरी उणीव आहे, या भावनेमुळे तुम्ही खोळंबता. परिपूर्णतेचा अट्टाहास करु नका. बांधिलकीची भावना जोपासा.
महान मुष्टियोद्धा मुहम्मद अली याला जेव्हा विचारलं गेलं की, तुम्ही किती जोर-बैठका काढता, तेव्हा त्याने उत्तर दिलं, मी सुरुवातीला जोर-बैठका मोजत नाही. जेव्हा वेदना जाणवू लागते, तेव्हा कुठे मी मोजायला सुरुवात करतो. विजेता असाच घडतो.
सबबी देण्यावर तुमचा विश्वास असेल, तर हे पुस्तक तुमच्यासाठी नाही. उत्कट, मानवी चैतन्याचे प्रशंसक, क्षमतेवर विश्वास असणारे, पूर्ण वेळ शिष्यत्व पत्करणारे... अशा सर्वांसाठी हे पुस्तक आहे.
वैवाहिक जीवनातले खाचखळगे ओळखा आणि दूर करा, एकमेकांमधील उत्तम ते समोर आणून, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा स्वभाव टाळून, आपल्याला मनोमन प्रेम आणि स्वीकार तेवढा हवा असतो. गंमत म्हणजे, ही वैश्विक भावना आहे. विवाह - अतिशय सुंदर अशा या नात्याचा पाया जाणून घेऊ यात.
माझ्या क्षमतांचा सर्वोत्तम वापर करण्यापासून मला थोपवू पाहणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे जणू एक साखळी. मला ती तोडलीच पाहिजे. हे पुस्तक तुम्ही वाचायला सुरुवात केली की, या साखळ्या तुटतील हा ठाम विश्वास आम्हाला आहे.
पालकत्वासाठी महत्त्वाचे काही, भविष्य वर्तवण्यामध्ये आपण माणसं अगदीच निरुपयोगी आहोत. भविष्यात काय वाढून ठेवलं आहे, ते आपल्याला माहिती नसल्यामुळे पालक म्हणून आपण मुलांना पुरेशी कौशल्यं देऊ शकत नाही, त्यांच्या परिपूर्ण भविष्याच्या दृष्टीने प्रस्थापित कारकीर्द देऊ शकत नाही.
प्रश्न विचारल्यावाचून प्रगती नाही. स्वत:च निर्माण केलेल्या साचलेपणातून प्रश्न आपल्याला बाहेर काढतात. प्रश्न आपल्यासमोर शक्यता आणतात. एरवी ज्या गोष्टींकडे आपण सोईस्करपणे दुर्लक्ष केलं असतं, त्या गोष्टींचा विचार करायला प्रश्न आपल्याला भाग पाडतात.
कृतीतून आत्मविश्वास आणि धैर्य जन्माला येतं. जिथे आहात तिथून सुरुवात करा. जे आहे त्याचा वापर करा. करता येईल ती कृती करा.