अमोघ वक्तृत्वाची देणगी लाभलेले, स्वर्गीय सावरकरांची विज्ञान निष्ठा समाजापुढे मांडण्यासाठी कार्यरत असणारे आचार्य अत्रे कट्टयाचे आधारस्तंभ चंद्रसेन टिळेकर माझे थोडेबहुत ओळखीचे आहत.
चंद्रसेन टिळेकरांचे विनोदीलेखन
अंधश्रध्दा हा आपल्या समाजाला जडलेला एक जबरदस्त मानसिक रोग आहे. वरवर जरी या रोगाची लक्षणे दिसत नसली, तरी सामाजिक मन हतबल होत असल्याचे वारंवार निदर्शनाला येत आहे.
आपल्या भारतीय समाजाला आज खरी गरज कशाची असेल तर ती गतिशील परिवर्तनाची! काही जाणती माणसे ते करीतही आहेत.
शतकांमागील समाजाचे चित्र चंद्रसेन टिळेकर यांनी आपल्या गोष्टींमधून उभे केलेले असले, तरी हे समाजचित्र मानवी जीवनात आजही जे घडते आहे, त्याच्यापासून दूर गेलेले नाही.