‘भारताच्या रस्त्यांवर, रेल्वे स्टेशनांत, बस थांब्यांवर आणि धार्मिक स्थळांपाशी अस्वच्छ कपड्यांतले, विस्कटलेल्या केसांचे असंख्य भुकेकंगाल लोक हटकून आढळतात. त्यांच्यातले जवळ जवळ चार लाख लोक मनोरुग्ण असतात. समाजाला त्यांची घृणा वाटते आणि भीतीही. त्यामुळे ते अस्तित्वातच नाहीत अशा थाटात समाज वावरतो.