आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राम्हण राहात होता. त्याचं नाव दादंभट. दादंभट अगदी गरीब होता. घरदार नव्हतं की जमीन - जुमला नव्हता. होती एक झोपडी त्याच्या मालकीची तीही नगराच्या बाहेर, नदीच्या जवळ अशी. तीही त्यानं स्वत:च बांधली होती
वास्तु ही कथा म्हणजे जुन्या जगाच्या ढासळत्या भिंतींना फुटलेली व्यथेची वाचा आहे. या संग्रहातील इतर दहा गोष्टींतूनही अशीच एक सर्वकष व्याकुळता अनुभवास येते. भारतीय संस्कृतीच्या स्थिर परंपरागत विश्वाचा विध्वंस करीत जे आजचे नवे जग जात आहे,