चाकोरीबद्ध विचारांच्या मजबूत चौकटीत राहूनही मेंदूला योग्य ते वैचारिक व्यायाम देऊन चाकोरीबाहेर जाऊन विचार करण्याचा सराव करता येतो आणि सृजनशील होता येते. हे व्यायम कोणते, ते कसे द्यावे, त्यात काय अडचणी येतात, त्यावर मात कशी करावी याचे मार्गदर्शन हे पुस्तक करते.