‘युगानुयुगे तूच’ या अजय कांडर लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील दीर्घकवितेच्या सुरुवातीला असलेला कवीचा एकवचनी आत्मस्वर कवितेच्या शेवटी मात्र ‘समूहाने बोलू पाहतो’ आणि दु:खाचे मळभ दूर होतील आणि नवी पालवी फुटणारच आहे, याची नि:संदिग्ध शब्दांत ग्वाही देतो.