श्रीरामकृष्ण परमहंसांचे चरित्र म्हणजे व्यवहार्य धर्माचे विवरणच होय. त्यांचे चरित्र वाचून आपणास परमेश्वराचा साक्षात्कार करून घेता येईल. त्यांच्या चरित्राचे पठण करीत असता केवळ एक परमात्माच सत्य असून इतर सर्व आभासमात्र आहे याची खात्री पटल्यावाचून राहणार नाही.