लेखिका प्रत्येक कथेतून एक वेगळा तर्कपूर्ण विचार आपल्यासमोर मांडते आणि विचार करायला लावते.
आयुष्याच्या उमेदीच्या काळातच मृत्युशी झुंजणारी वरेण्या... स्त्री-पुरुष संबंधांकडे धारदार नजरेने पाहणारी खैरुन बीबी...आत्महत्येच्या दोलायमान मनस्थितीत गुंतलेला विनोद....मानवी देह आणि त्यातील मनोवस्थांच्या सखोल चिंतनातून ‘काया’ कथासंग्रहातील प्रत्येक कथा आकार घेते.
सती अहल्येवर असलेल्या ओडिया कादंबरीचा मराठी अनुवाद.