महाराणी ताराराणींच्या कर्तुत्वांवर आधारलेले हे पुस्तक आहे..
मराठ्यांच्या इतिहासात येसूबाईंचा त्याग अपूर्व आहे. त्यांनी स्वराज्य, स्वधर्म आणि स्वातंत्र्य यासाठी आपले सारे जीवन वेचले. मराठेशाहीच्या इतिहासात आपल्या गुणांच्या जोरावर प्रकाशमान झालेली ‘राज-स्त्री’ म्हणजे येसूराणी.
स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांचे जीवनचरित्र म्हणजे समस्त मराठेशाहीची स्वराज्याची वाटचाल होय.
नाईक निंबाळकर राजघराण्याची सुकन्या, भोसले घरण्याची स्नुषा, राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांची सून आणि भोसले घराण्याच्या तीन सुकन्या व एकमेव छावा छत्रपती संभाजीराजे यांच्या मातोश्री अशा विविध अंगाने अत्यंत प्रभावीपणे सईबाईंच्या व्यक्तित्वाचा आढावा घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.