नेहरूंची स्वाधीनता सेनानी व भारताचे पहिले पंतप्रधान ही दोन व्यक्तिमत्त्वे जर काळजीपूर्णक लक्षात घेतली तरच त्यांच्या पंतप्रधानाच्या पदावरील कार्यकालाचे योग्य मूल्यमापन संभव होऊ शकेल.
महात्मा गांधी जन्मभर हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या मृगजळामागे धावत राहिले. हिंदू समाजावर महात्माजींचा नैतिक अधिकार व राजकीय प्रभाव इतका मोठा होता की भारताची फाळणी होऊन मुसलमानांकरता पाकिस्तान हा सवतासुभा निर्माण झाल्यावरही हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या प्रयत्नांचा फोलपणा हिंदू समाजाने स्वीकारला नाही.