ओवीगीतांची बोली, प्रेदशानुसार आंतरिक ताण, त्या त्या काळच्या परिस्थितीचा या गीतांवर झालेला परिणाम अशा पद्धतीने लोकगीतांची मानसशास्त्रीय व समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून तानाजी पाटील यांनी येथे सप्रमाण मांडणी केली आहे.
धनगरांचे बालपण, तरुणपण, प्रौढपणा आणि म्हातारपणातील काळ तसेच निसर्ग, समाज, नातेसंबंध आणि पशूप्राण्यांशी त्यांची जवळीक याविषयीच्या तरल जाणीवा सदर धनगरी ओवीगीतांमधून समोर येतात.