गीता-दर्शन अध्याय ६ : पूर्वार्ध श्र्लोक १ ते २१, प्रवचने १०.
शरीर आणि चेतना यांचा वियोग म्हणजे मृत्यू. निर्वाणाचा अर्थ आहे, दोन सत्यांची जाण! ज्याला आम्ही मृत्यू म्हणतो. तो मृत्यू नाही आणि त्याला जीवन म्हणतो, ते म्हणजे जीवन नाही.
मृत्यूच्या प्रत्यक्ष क्षणी आपण मृत्यूला जाणू शकत नाही, पण आयोजित मरण होऊ शकतं. या आयोजित मरणालाच ‘ध्यान’, ‘योग’, ‘समाधी’ असं म्हणतात.
कबीरांच्या सुंदर आणि भावात्म दोह्यांचे हे ओशोंनी केलेले अत्यंत रसाळ विवेचन. जीवनारंभापासून परमात्म्याच्या तेजोमय दर्शनापर्यंतच्या प्रवासात प्रेमाचे महत्व अपरंपार आहे. कबीर प्रेमाचा अर्थ हळूहळू उलगडत नेट अलगदपणे सर्वोच्च पायरीपर्यंत पोहोचवतात.
समाधीतले सिद्ध आणि ध्यानातले साधू गात आहेत. यती, सती, संतोषी, महान, शूरवीर गात आहेत. पंडित, विद्वान, ऋषीश्वर आणि त्यांचे वेद युगानुयुगे तुलाच गात आहेत. स्वर्गापासून पाताळापर्यंत तुझ्या गाण्याव्यतिरिक्त अजून कुठलेही स्वर नाहीत.
ओम्कार हे नाव परमात्म्याचं आहे. कारण जेव्हा सर्व शब्द हरवतात, तेव्हा चित्त शून्य होतं. तेव्हा लाटा मागे पडतात, तेव्हा मनुष्य सागरात तल्लीन, एकरूप होतो, तेव्हाही ओम्काराचा ध्वनी ऐवू येतो.
सुरति’ म्हणजे स्मरणातलं सातत्य. मण्यांतल्या धाग्यासारखं. तुम्ही संसारात सर्व काही करत रहा; पण परमात्म्याचं स्मरण ठेवा.
गंमत अशी आहे की, तुमचा धर्म हा तुमच्या भीतीचा विस्तार आहे. तुमचे सगळे तथाकथित भगवान, तुमच्या भीतीची धारणा आहेत. तुम्ही तीर्थस्नानं करा; मंदिर, गुरुद्वारा करा; पूजा-प्रार्थना सर्व व्यर्थ आहे. कारण जोपर्यंत तुमच्या हृदयातून आस्थेचा स्वर उमटत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याला हाक मारलेली नाही. जिथे शंका आहे, तिथे परीक्षा आहे.
कबीरांच्या दोह्यांमुळे ओशोही प्रभावित झाले आणि त्यांच्या प्रवचनांच्या माध्यमातून त्यांनी कबीरांच्या काही दोह्यांवर विस्तृत भाष्य केलं. तर ओशोंच्या अशा काही प्रवचनांचं संकलन ‘प्रेमरस...कबीराचा’ या पुस्तकात करण्यात आलं आहे.