या गणिती कोड्यांच्या संग्रहातील कोडी म्हणजे सहजसुंदर, मनोरंजक, उत्कंठा वाढविणारी, परत-परत सोडवावीशी वाटणारी अशी आहेत. थोडं सामान्य ज्ञान व गणिताचे जुजबी ज्ञान असलेल्या आणि तर्कशुद्ध विचार करू शकणार्या कोणलाही ती सोडविता येतील अशीच आहेत.
या पुस्तकातील कोड्यांचा गणिताचा म्हणजेच आकडेमोडीचा भाग जवळजवळ नाहीच. ती केवळ तर्कावर आधारलेली आहेत. ती तुम्ही सोडवाच आणि मनमुराद आनंद लुटा.