लेखिका डॉ. रजनी शेठ यांचा नात्यांचा विचार करायला लावणारा कथासंग्रह. आपली नाती आणि गिफ्ट रॅपर या दोन्हीत एक साम्य आहे ती दोन्ही युज अॅण्ड थ्रो असतात. आधी त्यामध्ये अनेक भावना अगदी हळूवारपणे, काळजीपूर्वक, कल्पकतेने बांधल्या जातात. पण जेव्हा त्याचा उपयोग संपतो तेव्हा कुणीच त्याचा कसलाच विचार करत नाही, टराटरा फाडून फेकून देतो.