स्त्री अंतरंगाचा वेध घेताना स्त्री-पुरुष संबंधामधले अनेक पैलू, शरीरसंबंधाचा मोहमायी क्षण टाळता आला, तर स्त्री-पुरुषांमध्ये एका सुंदर मैत्रीचा गोफ विणला जाऊ शकतो हे या पुस्तकामधील कथांमध्ये चित्रित झाला आहे. तसेच कथा रोचक वाटल्या तरी चिंतनशील मनाची स्पंदने अत्यंत तरलतेने या कथांमधून उमटतात.