ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही, ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे.
ऐसी कळवळयाची जाती हा प्रा. मिलिदं जोशी यांनी रेखाटलेल्या सतरा व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. शब्दांतून प्रकटलेल्या या व्यक्तींचे सुरम्य दर्शन घेताना वाचकही माझेप्रमाणे या व्यक्तींशी आत्मीय संबंध जोडतील, एवढी ही व्यक्तीचित्रे वेधक झालेली आहेत. आपल्या आतल्या दृष्टीपुढे या व्यक्ती साक्षात उभ्या राहतात. झाडांना नवी पालवी फुटते, तसे शब्दांना डोळे फुटतात.
मुलं, त्यांचे भावविश्व, त्यांची भावनिक बुद्धिमत्ता. सकारात्मक दृष्टीकोन, तरुणाई, अभ्यास, कुरियर, यशस्वीता या सर्व विषयांना स्पर्श करणारे प्रा. मिलिंद जोशी यांचे हे शास्त्रशुद्ध पुस्तक आहे.
जगाच्या दृष्टीने शिवाजीराव काळाच्या पडद्याआड गेले असले तरी त्यांच्या चिरंतन स्मृती जागविण्यासाठीच हा आठवणींचा जागर....
या जगात जी माणसं स्वकर्तृतवावर मोठी झाली, त्यांचा जीवनप्रवास खडतर होता. संघर्षाच्या आणि संकटांच्या मालिका त्यांच्या स्वागतासाठी उभ्या होत्या. नियती त्यांची सत्वपरीक्षा घेत होती. तरीही मोडून न पडता ही माणसं संकटांवर स्वार झाली.
स्त्री-पुरुषांच्या मनात दडलेल्या बोध-अबोध पातळ्यांवरील ‘व्यक्त-अव्यक्त’ दु:खांबद्दल आणि अशा दु:खांमुळे स्त्री-पुरुषांची विलक्षण घुसमट होत असते अनेक वेळा ती व्यक्तही करता येत नाही. अशा शापित माणसांच्या कथा आणि व्यथा यातून मांडल्या आहेत.
प्रा. मिलिंद जोशी यांच्या काही कथा ‘लोककथा’ या स्वरुपातील आहेत. ‘ रावणपिठले’ ही कथा वाचकांना हसवल्याशिवाय राहणार नाही. - द. मा. मिरासदार
अध्यात्म काय किंवा तत्त्वज्ञान काय, शेवटी जीवनातूनच उदयाला येत असते, याचा बोध करून देणारा हा लेखसंग्रह.
‘पानगळ या नवीन पुस्तकात मिलिदं जोशी यांच्यातील कथाकाराचे उत्कटतेने दर्शन घडते. या कथासंग्रहातील बहुतेक कथा या अस्वस्थ माणसांच्या अनुभवातून स्फुरलेल्या असल्या तरी या कथांमध्ये अभिव्यक्त झालेले अनुभव हे एकसुरी नाहीत.
२००५ सालचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा सह्याद्री पुरस्कार या चरित्र ग्रंथास लाभला आहे.
संतसाहित्य म्हणजे अध्यात्म, परमार्थ आणि निवृत्ती असेच चित्र आजच्या पिढीच्या मनात आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या आजच्या युगातल्या सर्व नव्या संकल्पना संतसाहित्यात सापडतात.
प्रा. मिलिंद जोशी लिखित पंधरा कथांचा संग्रह... ‘तमाच्या तळाशी’