तंट्या भिल्ल : तंट्या हा एक दरोडेखार होता, कायद्याने तो गुन्हेगार होता. असे असूनही जनतेची, वर्तमानपत्रांची त्याला सहानभूती होती. त्याला फाशी होऊ नये म्हणून वकिलांनीसुद्धा प्रयत्न केले. तो कायद्याने गुन्हेगार होता तरी माणूस म्हणून त्याच्यात काही उच्च कोटीचे गुण होते.