पावसाळ्यातल्या एका दुपारी ग्रेचेन रुबिनला अचानक साक्षात्कार झाला आणि तो देखील एका अनपेक्षित ठिकाणी-बसमध्ये. तिला जाणवले की, दिवस मोठे असतात, पण वर्षे छोटी असतात. वेळ निघून जात आहे, आणि महत्वाच्या गोष्टींवर मी पुरेसे लक्ष देत नाही आहे. त्याक्षणी तिने पुढचे एक वर्ष तिच्या ‘हॅपीनेस प्रोजेक्ट’ला वाहून घेतले. आनंदी कसे व्हावे या विषयी युगानयुगे अनुभवातून आलेले...